चोरट्यांच्या हाती लागला अर्धाच हार

By Admin | Updated: November 16, 2016 02:33 IST2016-11-16T02:33:38+5:302016-11-16T02:33:38+5:30

मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी पायी जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचा पोहे हार हिसकाविण्याची घटना

Thieves lost half the defeat in the hands of the thieves | चोरट्यांच्या हाती लागला अर्धाच हार

चोरट्यांच्या हाती लागला अर्धाच हार

पुणे : मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी पायी जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचा पोहे हार हिसकाविण्याची घटना पर्वती गावात रविवारी रात्री पावणेआठ वाजता घडली़ या महिलेने सतर्कता दाखवत हा हार पकडून ठेवल्याने चोरट्यांच्या हाती अर्धाच हार लागला़
पर्वती गाव येथे राहणाऱ्या ६३ वर्षाच्या महिला नातवासह घरी जात होत्या़ मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी हार हिसकाविण्याचा प्रयत्न केला़ ही बाब त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तो हार घट्ट पकडून ठेवला़ ५० हजार रुपयांचा अर्धाच हार चोरट्यांच्या हाती लागला़ (प्रतिनिधी)

Web Title: Thieves lost half the defeat in the hands of the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.