चोरट्यांनी लांबविले ४३ सिलिंडर
By Admin | Updated: August 15, 2014 00:54 IST2014-08-15T00:54:08+5:302014-08-15T00:54:08+5:30
घराजवळ उभ्या केलेल्या ट्रकचा पाठीमागील फाळका तोडून चोरट्यांनी घरगुती आणि व्यवसायासाठी वापरले जाणारे ४३ गॅस सिलिंडर चोरून नेले

चोरट्यांनी लांबविले ४३ सिलिंडर
पिंपरी : घराजवळ उभ्या केलेल्या ट्रकचा पाठीमागील फाळका तोडून चोरट्यांनी घरगुती आणि व्यवसायासाठी वापरले जाणारे ४३ गॅस सिलिंडर चोरून नेले. ही घटना चाकण-शिक्रापूर रस्त्यावर कडाची वाडी येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी ट्रकचालक मधुकर विठ्ठल चांदणे (रा. गणेशनगर, कडाची वाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
चांदणे यांनी सिग्मा गॅस सर्व्हिसेस (सणसवाडी प्लांट) येथून व्यावसायिक व घरगुती वापराचे गॅस सिलिंडर वाहनात भरले होते. ते खाली करण्यासाठी जात असताना रात्र झाल्याने मंगळवारी (दि. १२) सायंकाळी ट्रक (एमएच ०४ सीए ११९५) त्यांनी चाकण-शिक्रापूर रस्त्यालगतच्या कडाची वाडी येथे उभा केला
होता. मध्यरात्रीनंतरच्या सुमारास चोरट्यांनी ७६ हजार ५२४ रुपये किमतीचे सिलिंडर चोरी झाल्याचे त्यांच्या
निदर्शनास आले. (प्रतिनिधी)