शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट; मोबाईल, सोन चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 18:28 IST

गणेश विसर्जन मिरवणूकीत मोबाईल आणि सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळ्यांनी चांगलंच डोकं वर काढलं होतं.

ठळक मुद्दे गणेश विसर्जन मिरवणूकीत मोबाईल आणि सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळ्यांनी चांगलंच डोकं वर काढलं होतं. भाविकांच्या नकळतपणे मोबाईल लंपास करण्याच्या प्राथमिक अंदाजानुसार जवळपास दीड हजार घटना घडल्या.मोबाईल चोरीची तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या नागरीकांना ऑनलाईन तक्रार करण्यास सांगून पोलीस आपली जबाबदारी झटकत होते.

पुणे, दि. 6 - गणेश विसर्जन मिरवणूकीत मोबाईल आणि सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळ्यांनी चांगलंच डोकं वर काढलं होतं. भाविकांच्या नकळतपणे मोबाईल लंपास करण्याच्या प्राथमिक अंदाजानुसार जवळपास दीड हजार घटना घडल्या.  मोबाईल चोरीची तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या नागरीकांना ऑनलाईन तक्रार करण्यास सांगून पोलीस आपली जबाबदारी झटकत होते.  विशेष म्हणजे पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आलेल्या  ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चा सर्व्हर गेल्या दहा दिवसांपासून डाऊन आहे. याबाबत पोलीस स्थानकांना माहिती नसल्याचं दिसून आलं. पोलिसांनी चोरीच्या तक्रारी नोंदविण्यास केलेली टाळाटाळ आणि ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेक नागरीकांना तक्रारी नोंदवताच आल्या नाहीत. 

गणपती विसर्जनाच्या दिवशी पाऊस नसल्याने भाविक मोठ्या संख्यने विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांवर थांबले होते. सकाळपासूनच मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लक्ष्मी आणि टिळक रस्त्यासह शहराच्या मध्यवस्तीतील प्रमुख रस्त्यांवर गणेशभक्तांची गर्दी उसळली होती. या गर्दीमध्ये आबालवृद्धांचाही सहभाग होता. तरुण-तरुणी, आयटीयन्स, महाविद्यालयीन तरुणांसह अनेक जण कुटुंबासोबत मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांवर उभे होते. या गर्दीचा फायदा घेण्यासाठी चोरांच्या टोळ्या मिरवणूकीत सक्रिय झाल्या होत्या. चोरट्यांनी अनेकांचे मोबाईल लंपास केले. मानाच्या विसर्जन मिरवणूकींसह रात्री उशीरापर्यंत गर्दीचा ओघ कायम होता. बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आदी प्रमुख रस्त्यांवर चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. खिशातले मोबाईल चोरटे शिताफीने चोरत होते. गर्दीतून बाहेर आल्यानंतर कित्येकांना आपला मोबाईल चोरीला गेल्याचं लक्षात येत होतं. 

मोबाईलबरोबरच महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळ्या चोरीच्या घटनाही पाहायला मिळाल्या. अनेक जण पोलीस मदत केंद्रावर जाऊन मोबाईल चोरी झाल्याच्या तक्रारी देत होते. मात्र पोलीस ठाण्यातील कर्मचारी नागरीकांची मोबाईल चोरीची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करीत होते. पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या पोर्टवर ऑनलाईन एफआयआर नोंदविण्यास सांगून नागरीकांना पिटाळून लावत होते. तरीही काही जणांनी पोलिसांशी हुज्जत घालून तक्रार नोंदवून घेण्यास भाग पाडलं. दरम्यान पोलीस आयुक्तालयातील महिला कर्मचा-यांनी 28 ऑगस्ट पासून  ‘लॉस्ट अँड फाऊंड’ पोर्टलचा सर्व्हर डाऊन असल्याचं सांगितलं. हा सर्व्हर असाच डाऊन राहीला, तर नागरीकांनी केलेल्या तक्रारी कधी संबंधित पोलीस ठाणे आणि उपायुक्तांना मिळणार? आणि कधी कारवाई केली जाणार? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :theftचोरी