चोर सापडेना म्हणून, बस पोलीस ठाण्यात

By Admin | Updated: February 9, 2017 03:17 IST2017-02-09T03:17:17+5:302017-02-09T03:17:17+5:30

एसटी बसमध्ये बसताना प्रवासी महिलेची पर्समधून तीन हजारांची रोकड चोरीला गेल्याचा प्रकार बुधवारी (दि. ८) सायंकाळी घडला

As thieves find, bus police station | चोर सापडेना म्हणून, बस पोलीस ठाण्यात

चोर सापडेना म्हणून, बस पोलीस ठाण्यात

बारामती : एसटी बसमध्ये बसताना प्रवासी महिलेची पर्समधून तीन हजारांची रोकड चोरीला गेल्याचा प्रकार बुधवारी (दि. ८) सायंकाळी घडला. चोरीचा शोध घेण्यासाठी एसटी बस थेट शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आली.
एसटी बसमधील प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यानंतरच एसटी बस पोलीस ठाण्यातून बाहेर पडली. या प्रकारामुळे एसटीतील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. बारामती बसस्थानकातून सायंकाळी ५.३० वाजता बारामती-नातेपुते ही बस निघाली होती. या वेळी एसटी बस ८० प्रवाशांनी खचाखच भरली होती. यामध्ये बसच्या मार्गावरील आसपासच्या गावांमध्ये जाणाऱ्या शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा देखील समावेश होता. बस प्रवाशांनी पूर्ण भरल्यानंतर नातेपुतेला निघण्याच्या तयारीत असतानाच बसमधील प्रवासी महिलेच्या पर्समधील ३ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले.
बसस्थानक परिसरात या चोरीचा शोधदेखील घेण्यात आला. रकमेचा शोध न लागल्याने एसटी बस थेट शहर पोलीस ठाण्यात वळविण्यात आली. त्यानंतर पोलीस ठाण्यात चालक अस्लम मुलाणी, वाहक मनोज वेदपाठक त्या प्रवासी महिलेसह पोहोचले. या वेळी पोलीस कर्मचारी जी. एम. पवार, जी. एम. नांदे, वळेकर, उमेश गायकवाड यांनी एसटी बसमध्ये प्रवाशांना खाली उतरवून रकमेचा शोध घेतला. मात्र, चोरीला गेलेल्या रकमेचा शोध लागला नाही.

Web Title: As thieves find, bus police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.