कुंबळजाई मंदिर गावापासून बाजूला आहे. मात्र, येथील या देवतेवर ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांची श्रध्दा असल्यामुळे दिवसभर येथील भाविक या मंदिरात येत जात असतात. गेल्या अनेक वर्षांत चोरीचा प्रकार या देवळात झाला नसल्याचे येथील पोलीस पाटील शामराव शिळीमकर यांनी सांगितले.
चोरट्यांनी या देवळात कोणी नसताना रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गाभाऱ्यातील दानपेटी देवळात न फोडता देवळाजवळील संपत दिनकर शिळीमकर यांच्या शेतात नेऊन दगड आदी तत्सम हत्याराने दानपेटी फोडली. कोरोना साथीच्या प्रभावाच्या काळात गेले अनेक दिवस झाले ग्रामस्थानी त्यातील रक्कम काढलेली नव्हती, असे पोलीस पाटील शिळीमकर यांनी पोलिसांना पंचनाम्याच्या वेळी माहिती देताना सांगितले. पंचनामा झाल्यानंतरही सदरहू दानपेटी उपड्या अवस्थेत शेतात दिवसभर पडलेली ग्रामस्थांना पहायला मिळाली होती व सदर पेटीत भाविकांनी टाकलेली दक्षिणा रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
वीरवाडी (ता.भोर)येथील कुंबळजाई मंदिरातील दानपेटी फोडून त्यात जमा झालेले दान चोरट्यांनी लंपास केली त्याचे राजगड पोलीस पंचनामा करताना पोलीस कर्मचारी.