चोरटय़ांची बापलेकाला मारहाण
By Admin | Updated: August 7, 2014 23:16 IST2014-08-07T23:16:15+5:302014-08-07T23:16:15+5:30
निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे चोरटय़ांनी बापलेकाला जबर मारहाण करून जखमी केले व घरातील 60 हजार रुपये किमतीचे दागिने लांबविले.

चोरटय़ांची बापलेकाला मारहाण
>दावडी : निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे चोरटय़ांनी बापलेकाला जबर मारहाण करून जखमी केले व घरातील 60 हजार रुपये किमतीचे दागिने लांबविले. ही घटना गुरुवारी (दि. 7) पहाटे घडली. अस्लम अहमद पठाण व मुलगा आयाज पठाण ही जखमींची नावे आहेत. पोलिसांनी संशयित आरोपींना पडकले आहे.
येथील अस्लम अहमद पठाण, पत्नी गुलनाज पठाण, आई लतोबी पठाण, मुलगा आयाज व चांदभाई व मुलगी तबुसन असे रात्री नऊ वाजता झोपले होते.
अस्लम यांची पत्नी रात्री अडीच वाजता उठली असता घराचा दरवाजा उघडा दिसला व दरवाजात सहा अनोळखी व्यक्ती दिसल्या. त्यांनी पती अस्लम यांना उठवले. बाहेर कोण माणसे आली आहेत असे सांगितले. अस्लम हे बाहेर जाण्यास निघाले असता त्या वेळी (पान 8 वर)