शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या 'ड्रीम सिटी'वर भुरट्या चोरांचा डल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 16:27 IST

डीएसकेंना गुंतवणूकदारांचे पैसे बुडविल्या प्रकरणी अटक झाल्यानंतर हा प्रकल्प अडचणीत आला.

गणेश खंडाळे- 

पुणे :  कदमवाक वस्ती हद्दीत असलेल्या डीएसकेंचा 'ड्रीम सिटी' हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प होता. परंतु डीएसकेंना गुंतवणूकदारांचे पैसे बुडविल्या प्रकरणी अटक झाल्यानंतर हा प्रकल्प अडचणीत आला. आज या प्रकल्पाला कोणी वाली नसल्यामुळे या ठिकाणी असलेल्या डीएसके इंटरनॅशनल कॉलेज ऑफ डिझाईन हे उध्वस्त झाले आहे. गेले वर्षभर एकही सुरक्षा रक्षक नाही. त्यामुळे भुरट्या चोरांना तर 'अलिबाबाची गुहा'च सापडल्यासारखे झाले आहे. 

१६ फेब्रुवारी २०१८ रोजी डी.एस. कुलकर्णी यांना दिल्लीतून अटक करण्यात आली. तोपर्यंत येथे कामकाज सुरू होते. ड्रीम सिटीच्या पहिल्या टप्प्यात या ठिकाणी चार इमारती बांधण्यात आल्या होत्या. दोन इमारती विद्यार्थी शिक्षक यांच्या राहण्यासाठी हॉस्टेल्स आहेत. तर दोन इमारती या कॉलेजच्या आहेत.  त्यासोबतच दोन प्रशस्त मैदाने आहेत. 

परंतु गेले वर्षभर येथील कामकाज बंद आहे. याठिकाणचे सुरक्षारक्षकांनी लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच सेवा देणे बंद केले होते. त्यानंतर या ठिकाणी कोणतेही सुरक्षारक्षकन नाही. इमारतीमध्ये सर्वत्र काचांचा खच पडला आहे. दरवाजे तोडले आहेत. अत्यंत किंमती यंत्र सामग्री चोरीला गेली आहे. हॉस्टेलमधील अत्यंत दर्जेदार फर्निचच्या चोरीचे काम सध्या सुरू आहे. 

डीएसके यांचा हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर या ठिकाणी रोजगाराच्या संधी स्थानिक तरुणांना मिळाल्या असत्या रिंगरोडचे काम वेगाने झाले असते. परंतु डीएसकेच अटकेत असल्यामुळे आता या ठिकाणी कोणी वाली नाही. गुंतवणूक दारांचे पैसे पाण्यात गेले आहेत.  या पायाभूत सुविधा भाड्याने जरी दिल्या असत्या तरी काही रक्कम गुंतवणूक दारांना परत मिळाली असती.

माझे घर या डिझाईन कॉलेजला लागूनच आहे. रात्रभर तोडफोडीचे आवाज येत असतात. परंतु यावर आता कोण नियंत्रण ठेवणार.- अनिल टिळेकर,पंचायत समिती सदस्य

कदमवाकवस्तीचे माजी ग्रामपंचायत सदस्य राजू हिंगणे यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी धक्कादायक परिस्थिती सांगितली. जे टुकार गुटका खाऊन फिरत होते. असे काही या चोरीच्या पैशांवर गळ्यात सोन्याचे गोफ घालून फिरू लागले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीArrestअटक