शिरोलीत गाई चोरणारे चोरटे अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:11 IST2021-07-31T04:11:03+5:302021-07-31T04:11:03+5:30

दिलीप सोपान गावडे (रा. धानोरे खंडोबाचीवाडी, ता. खेड), सोमनाथ शिवाजी चौधरी (रा. मरकळ रोड, घोलपवस्ती आळंदी, ता.खेड) असे गुन्हा ...

Thieves arrested for stealing cows in Shiroli | शिरोलीत गाई चोरणारे चोरटे अटक

शिरोलीत गाई चोरणारे चोरटे अटक

दिलीप सोपान गावडे (रा. धानोरे खंडोबाचीवाडी, ता. खेड), सोमनाथ शिवाजी चौधरी (रा. मरकळ रोड, घोलपवस्ती आळंदी, ता.खेड) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरोली येथील शेतकरी विजय गोपाळ पवळे हे गुरुवार (दि.२९) दुपारी एकच्या सुमारास शेतात शेतकाम करत असताना त्यांच्यापासून थोड्याशा लांब अंतरावर ॉबांधलेली गाय सुटली होती. त्यामुळे ती पुन्हा बांधण्यासाठी ते गायीजवळ आल्यावर तेथे एक छोटा हाती वाहनातून (एम.एच.१४ एच.यु.२४१८) त्या गायींना पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न दोन तरुणी करत होते. त्यामुळे पवळे यांनी आरडा-ओरडा करून जवळपासच्या ग्रामस्थांना बोलावले आणि गाडीत गायी भरणाऱ्यांना गाडीसमोर थांबवून ठेवले. राजगुरुनगर पोलिसांना कळवून गायी चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोन इसमांना गाडीसह पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर गायी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Thieves arrested for stealing cows in Shiroli