पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणारे चोरटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST2021-07-11T04:08:30+5:302021-07-11T04:08:30+5:30

पुणे : काही दिवसांपासून पुणे स्टेशन परिसरात नागरिकांना शस्त्राच्या धाकाने लुटणे, पत्ता विचारण्याचा बहाणा करून मोबाईल हिसकावण्याचे प्रकार घडत ...

Thieves arrested for robbing passengers in Pune station area | पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणारे चोरटे जेरबंद

पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणारे चोरटे जेरबंद

पुणे : काही दिवसांपासून पुणे स्टेशन परिसरात नागरिकांना शस्त्राच्या धाकाने लुटणे, पत्ता विचारण्याचा बहाणा करून मोबाईल हिसकावण्याचे प्रकार घडत होते. प्रवाशांना लुटणाऱ्या अशा दहा चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले. लोहगाव व खडकी बाजार परिसरात त्यांना ताब्यात घेण्यात आले. या वेळी त्यांच्या ताब्यातून दोन रिक्षा, चार मोबाईल व एक सोन्याची साखळी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाच दिवसांपूर्वी प्रवाशाला लुटल्याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, गुन्हे निरीक्षक अभय महाजन यांना जबरी चोरी करणारे संशयित आरोपी खडकी बाजार व लोहगाव परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथके तयार करून दोन्ही ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत तब्बल दहा जणांना अटक केली. बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी पाच गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

-----------------

Web Title: Thieves arrested for robbing passengers in Pune station area