चोरी करणारे गजाआड

By Admin | Updated: January 14, 2017 03:36 IST2017-01-14T03:36:52+5:302017-01-14T03:36:52+5:30

गोदामामधून २ लाख २३ हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या दोघांना सिंहगड रोड पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्याकडून चोरीला

Thieves | चोरी करणारे गजाआड

चोरी करणारे गजाआड

पुणे : गोदामामधून २ लाख २३ हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या दोघांना सिंहगड रोड पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
सलीम हकिम खान (वय १९, रा. हरीओम सुपर मार्केट, वडगाव पाण्याच्या टाकीजवळ) आणि ललित कुमार डांगी (वय १९, रा. आंधेकर गल्ली, जैन मंदिराजवळ, गुरुवार पेठ, मूळ रा. ता. सिरोई, राजस्थान) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भवरलाल परिहार (वय ३९, रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विष्णू जगताप, निरीक्षक (गुन्हे) बबन खोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, सहायक फौजदार कैलास मोहळ, कर्मचारी पांडुरंग वांजळे, चंद्रकांत मोरे, संतोष सावंत, प्रशांत काकडे, नीलेश कुलथे, नीलेश जमदाडे, उमेश फणसे, शिवानंद कायगुडे यांच्या पथकाने केली.

Web Title: Thieves