चाकण : खराबवाडी (ता. खेड) येथून अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरात प्रवेश करून पिशवीमधील पाकिटातील दोन तोळ्याचे सोन्याचे झुबे, मोबाईल सह घराबाहेरील सायकल घेऊन पोबारा केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे अंमलदार सुभाष पवार यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास खराबवाडी येथे घडली. या प्रकरणी अनिता महादू कोमले (वय ३४, रा. संदीप फलटणकर यांची खोली, कुशल स्वर्णाली सोसायटी जवळ, खराबवाडी, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे.भरदिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चोरट्यांची दहशत पसरली आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुभाष पवार पुढील तपास करीत आहेत.
खेड तालुक्यातील खराबवाडीमध्ये भरदिवसा घरात घुसून चोरी; मोबाईल, सायकलसह दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 18:32 IST
खराबवाडी (ता. खेड) येथून अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरात प्रवेश करून पिशवीमधील पाकिटातील दोन तोळ्याचे सोन्याचे झुबे, मोबाईल सह घराबाहेरील सायकल घेऊन पोबारा केला.
खेड तालुक्यातील खराबवाडीमध्ये भरदिवसा घरात घुसून चोरी; मोबाईल, सायकलसह दागिने लंपास
ठळक मुद्देअज्ञात चोरट्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलभरदिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चोरट्यांची दहशत