शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

चोरट्याने एका पाठोपाठ तीन महिलांच्या गळ्यातील दागिने पळविले; पुणे शहरातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 14:37 IST

गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याचा प्रकार रविवारी दिवसभरात घडला...

पुणे : मोटारसायकलवरुन आलेले दोन चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवित असल्याचे आजवरच्या घटनांमध्ये आढळून आले आहे. परंतु, एका चोरट्याने एकट्याने एका पाठोपाठ तीन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याचा प्रकार रविवारी दिवसभरात घडला आहे. या तिन्ही चोऱ्या एकाच चोरट्याने केल्याचा पोलिसांना संशय आहे.

यातील पहिली घटना बिबवेवाडी येथील पासलकर चौकाजवळ रविवारी दुपारी १ वाजता घडली. याबाबत पर्वती दर्शन येथील एका ५२ वर्षाच्या महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या पतीसह मोटारसायकलवरुन घरी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्या घरातील १७ ग्रॅम वजनाचे ५५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले. परंतु, त्यांनी हे मंगळसुत्र धरल्याने त्याचा अर्धा भाग चोरट्याकडे गेला. तो घेऊन चोरटा पळून गेला.

दुसरी घटना कोथरुडमधील महात्मा सोसायटीतील भुजबळ टाऊनशिप येथे दुपारी पावणेतीन वाजता घडली. याबाबत एका ५६ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या मुलीसह एका कार्यक्रमावरुन घरी जात होत्या. त्यावेळी त्यांची मुलगी खरेदी करण्यासाठी दुकानात गेल्याने त्या रस्त्याच्या कडेला वाट पहात थांबल्या होत्या. तेव्हा मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १ लाख ९० हजार रुपयांचे ५० ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र हिसकावून नेले.

तिसरी घटना कर्वे रोडवरील डेक्कन जिमखान्यावरील सावरकर चौकात दुपारी साडेतीन वाजता घडली. याबाबत हडपसर येथील एका ३२ वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या आपल्या पतीसह मोटारसायकलवरुन जात होत्या. सावरकर चौकात सिग्नल लागल्याने ते सिग्नलला थांबले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या मोटारसायकलवरुन चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे ११ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून तो पळून गेला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड