शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लायसन्स परत करुन चाेरट्याची लिमिटेड माणूसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 21:10 IST

पुण्यात एक अागळी-वेगळी चाेरीची घटना समाेर अाली अाहे. एका चाेराने कारमधील बॅग चाेरली. काही दिवसांनी त्यातील लायसन्स महिलेला कुरिअर करुन परत केले.

ठळक मुद्देचाेराने लायसन्स पाठवले कुरिअरनेगाडीची काच फाेडून चाेरली हाेती बॅग

पुणे : शहर जसं स्मार्ट सिटी हाेतंय, तसेच पुण्यातले चाेरही स्मार्ट हाेत चालले अाहेत. एक अागळी-वेगळी चाेरीची घटना पुण्यात घडली अाहे. एका चाेराने चाेरलेल्या बॅगेतील लायसन्स चक्क कुरिअर करत फिर्यादीला परत पाठवल्याची घटना समाेर अाली अाहे.     पुण्यातील व्यावसायिक सपना डे यांच्यासाेबत ही घटना घडली अाहे. सपना या 17 मार्च राेजी संध्याकाळी साडेसहा च्या सुमारास अापली कार रेस काेर्सच्या शेजारी पार्क करुन पायी फिरण्यासाठी गेल्या हाेत्या. अर्ध्यातासाने परत अाल्यावर त्यांच्या गाडीची काच फाेडून मागील सीटवरील बॅग चाेरांनी चाेरुन नेली हाेती. त्या बॅगेत त्यांचे लायसन्स, घराच्या व दुकानाच्या चाव्या अाणि पंधराेशे रुपये हाेते. ही घटना समजताच सपना यांनी वानवडी पाेलीस चाैकीमध्ये तक्रार दाखल केली. लायसन्स चाेरीला गेल्याने त्यांना गाडी चालवणे अवघड झाले हाेते. त्यांनी त्यांच्या मुलाला सांगून नवीन लायसन्स काढण्याची प्रक्रीया सुरु केली. लायसन्स गमवल्याची खंत त्यांना हाेती. त्यांच्याकडे त्याची झेराॅक्सही नव्हती. परंतु गुरुवारी त्यांच्या नावाने अालेले पार्सल पाहून त्यांना धक्काच बसला. ज्या चाेराने त्यांची बॅग चाेरली हाेती त्याने चक्क सपना यांचे लायसन्स कुरिअर करुन पाठवले हाेते.     सपना या गेल्या 29 वर्षांपासून रेस काेर्स जवळ चालण्यास जातात. मात्र असा प्रसंग त्यांच्यसाेबत पहिल्यांदाच घडला अाहे. अाधी त्या दुचाकीवर या ठिकाणी जात असत. गेल्या काही काळापासून त्यांनी कार वापरण्यास सुरुवात केली हाेती. या प्रसंगाबाबत बाेलताना सपना म्हणाल्या, 17 मार्च राेजी रेस काेर्सजवळ गाडी लावून चालण्यास गेले हाेते. अाल्यावर गाडीची काच फाेडून मागच्या सीटवरील बॅग चाेरल्याचे समाेर अाले. बॅगमध्ये लायसन्स ,पेसै तसेच घराच्या व दुकानाच्या चाव्या हाेत्या. गुरुवारी माझ्या नावाने कुरिअर अाले, ते उघडून पाहिल्यावर त्यात माझे लायसन्स असल्याचे समाेर अाले. चाेर बहुदा स्मार्ट असावेत त्यांनी माझे लायसन्स परत केले मात्र त्यासाेबत बाकीच्या गाेष्टी त्यांनी पाठवल्या नाहीत. 

टॅग्स :Puneपुणेtheftचोरी