स्वारगेट येथून बेडीसह पळालेल्या चोरट्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:24 IST2021-01-13T04:24:51+5:302021-01-13T04:24:51+5:30

पुणे : येरवडा कारागृहातून तपासासाठी ताब्यात घेऊन उमरगा येथे घेऊन जाण्यासाठी आणलेला चोरटा पोलीस हवालदाराला धक्का देऊन बेडीसह पळून ...

Thief arrested with fleeing from Swargate | स्वारगेट येथून बेडीसह पळालेल्या चोरट्याला अटक

स्वारगेट येथून बेडीसह पळालेल्या चोरट्याला अटक

पुणे : येरवडा कारागृहातून तपासासाठी ताब्यात घेऊन उमरगा येथे घेऊन जाण्यासाठी आणलेला चोरटा पोलीस हवालदाराला धक्का देऊन बेडीसह पळून गेला. स्वारगेट पोलिसांनी त्याला वारजे माळवाडी येथून अटक केली आहे.

रोहन विरू सोनटक्के (रा. यशोदीप चौक, वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार यशवंत सगर यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार सगर उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. मुरूमधील चोरीच्या गुन्ह्यात सोनटक्केचा हात असल्याची माहिती समजल्यानंतर त्याला येरवडा कारागृहातून तपासासाठी ताब्यात घेऊन सगर हे त्याला पीएमपी बसने स्वारगेटला घेऊन आले. बसमधून मागच्या दाराने उतरत असताना सोनटक्के याने सगर यांच्या हातात असलेल्या दोरीला हिसका देऊन सगर यांना खाली पाडले. बेडी व दोरीसहीत तो पळून गेला. सोनटक्के यांनी त्वरीत स्वारगेट पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेची माहिती घेऊन स्वारगेट पोलिसांनी तातडीने हालचाल करुन रोहन सोनटक्के याच्या वारजे माळवाडी येथील घराजवळ सापळा रचला. घरी आलेल्या सोनटक्के याला पोलिसांनी अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी सांगितले.

Web Title: Thief arrested with fleeing from Swargate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.