चोरट्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:09 IST2021-06-26T04:09:03+5:302021-06-26T04:09:03+5:30
राजाराम नारायण आलम ( रा. बहुळ ) यांनी चाकण पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार शेलपिंपळगाव येथे जय हनुमान कलेक्शन या नावाने ...

चोरट्यास अटक
राजाराम नारायण आलम ( रा. बहुळ ) यांनी चाकण पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार शेलपिंपळगाव येथे जय हनुमान कलेक्शन या नावाने कपड्याचे दुकान आहे. (१८ जून ) च्या मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्याने दुकानाच्या मागील बाजूचे पत्रे कापून, आतमध्ये प्रवेश करून दुकानात विक्रीसाठी ठेवलेले एक लाख रुपये किमतीचे कपडे चोरून नेले होते. चाकण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज तपासणी केली. त्यामध्ये चोरट्याने दुकानातील कपडे ( एमएच १४ सीपी ३१९१ ) या टेम्पोमधून नेल्याचे दिसून आले.
चाकण पोलिसांनी सखोल तपास करून सचिन मधुकर वाघ ( रा.आळंदी ) यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने शिवा याच्या मदतीने चोरी केल्याचे कबुल केले.
कपड्याची चोरी प्रकरणी अटक आरोपी व चाकण पोलीस.