‘त्यांनी’ पाहिले वेश्यावस्तीतील जीवन

By Admin | Updated: June 17, 2014 02:22 IST2014-06-17T02:22:41+5:302014-06-17T02:22:41+5:30

देहविक्री करून जीवन कंठत असलेल्यांना वेश्यांकडे होणारे दुर्लक्ष नेहमीचेच...

'They' saw prostitution life | ‘त्यांनी’ पाहिले वेश्यावस्तीतील जीवन

‘त्यांनी’ पाहिले वेश्यावस्तीतील जीवन

पुणे : देहविक्री करून जीवन कंठत असलेल्यांना वेश्यांकडे होणारे दुर्लक्ष नेहमीचेच... पण त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चक्क क्युबा देशाचे भारतातील वाणिज्यदूतातील प्रमुख अधिकारी आज पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत आले होते. तेथे त्यांनी प्रत्यक्ष महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
क्युबा देशाचे भारतातील वाणिज्यदूतातील प्रमुख अधिकारी अलॉ ओलिव्हिए यांनी आज वेश्यांसाठी काम करणाऱ्या सहेली संस्थेला भेट दिली आणि त्यांच्याबरोबर वेश्यावस्तीच्या विविध भागांमध्ये जाऊन वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या समस्या, त्यांचे राहणीमान जाणून घेतले.
या भेटीबाबत ओलिव्हिए यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मी पहिल्यांदाच वेश्यावस्तीला भेट दिली. या वस्तीत काम करणाऱ्या माझ्या काही मित्रांनी मला येथील माहिती दिली होती. या महिलांसाठी काम करणाऱ्या सहेली संस्थेची मला माहिती मिळाली. वेश्यावस्तीमध्ये फिरताना मला येथील वास्तवाची जाणीव झाली. त्या देहविक्री करीत असल्याने त्यांचे आरोग्याचे, जगण्याचे अनेक प्रश्न असल्याचे मला दिसले. त्यांच्याशी बोलताना मला त्यांच्या समस्या जाणवल्या. वेश्याव्यवसाय करण्यासाठी भारतातील वेगवेगळ्या भागांतून, इतर देशांमधून आलेल्या महिलांशीही मी या वेळी संवाद साधला.
या भेटीतून काहीतरी करण्याचा माझा मानस आहे, असे सांगत ओलिव्हिए म्हणाले, की भारत आणि क्युबा देशात या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवकांना अधिक अनुभव मिळण्यासाठी आणि समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी करार करून त्यांना एकमेकांच्या देशात पाठविता येईल का, असा विचार मी सुरू केला आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम लवकरच सुरू होईल. (प्रतिनिधी)

Web Title: 'They' saw prostitution life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.