शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ४ तासात 'ते' हरवलेले दागिने मिळाले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 11:25 IST

अमीत जव्हेरी हे शनिवारी लग्न समारंभासाठी कल्याणहून पुण्यात आले होते.

पुणे : कल्याण येथून पुण्यामध्ये लग्नासाठी आलेल्या जोडप्याचे २ लाख रुपयांचे हरवलेले सोन्याचे दागिने खडक पोलिसांनी चार तासांत शोधून परत केले. अमीत जव्हेरी (वय ३५) हे शनिवारी  लग्न समारंभासाठी कल्याणहून पुण्यात आले होते. ते पुणे स्टेशन येथून गुरुवार पेठेतील शितळादेवी चौकात जाण्यासाठी रिक्षात बसले. शितळादेवी चौकात उतरल्यानंतर त्यांची दागिन्याची बॅग रिक्षामध्ये विसरली. जव्हेरी यांनी रिक्षा चालकाचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी मिठगंज पोलीस चौकीत धाव घेत घडलेला प्रकार पोलीस उप निरीक्षक मिना तडवी यांना सांगितला. पोलीस उपनिरीक्षक तडवी यांनी मार्शल कर्मचारी वैभव भोसले आणि नितीन दुरगुडे यांना रिक्षाचा शोध घेण्यास सांगितले.पोलीस कर्मचारी भोसले आणि दुरगुडे यांनी जव्हेरी हे ज्या मार्गाने रिक्षातून आले. त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचा शोध घेतला. तसेच रिक्षा मालकाचा नंबर आरटीओ कार्यालयातून घेऊन संपर्क साधला. रिक्षा मालकाने ही रिक्षा राजेंद्र घोडके याला चालविण्यास दिली असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घोडकेचा शोध घेऊन रिक्षाची तपासणी केली असता जव्हेरी यांची विसरलेली बॅग रिक्षाच्या पाठीमागे आढळून आली. बॅग पोलीस ठाण्यात आणून ती बॅग जव्हेरी यांची असल्याची खात्री करुन बॅग जव्हेरी यांना परत केली. खडक पोलिसांनी चार तासात हरवलेली बॅग परत मिळवून दिल्याने अमीत जव्हेरी यांनी खडक पोलिसांचे आभार मानले.ही कामगिरी खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उप निरीक्षक मिना तडवी, पोलीस हवालदार टोपे, पोलीस शिपाई वैभव भोसले, नितीन दुरगुडे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसjewelleryदागिनेauto rickshawऑटो रिक्षा