शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे त्याही सापडल्या संकटात ; एकमेकींचा आधार होत केली उपासमारीवर मात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 17:28 IST

संचारबंदीमुळे कोणी त्यांच्याकडे फिरकतही नाही.

ठळक मुद्देदेवदासींची जगण्याची लढाई : वीर हनुमान मंडळाचे सहकार्य

पुणे: कोरोना निर्मूलनासाठी लागू झालेल्या संचारबंदीमुळे निर्माण झालेला रोजच्या जेवणाचा प्रश्न बुधवार पेठेतील देवदासींनी स्वतःच एकमेकींचा आधार होऊन सोडवला आहे. एका मंडळाच्या सहकार्याने रोज आळीपाळीने स्वयंपाक करून तब्बल ४०० महिला कशाबशा दिवस ढकलत आहेत.शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचे सध्या हाल सुरू आहेत. बहुतेकजणी परप्रांतीय आहेत. संचारबंदीमुळे कोणी त्यांच्याकडे फिरकतही नाही.शिल्लक पैसा सुरूवातीच्या एकदोन दिवसातच संपला आणि या महिलांना ऊपास घडू लागले. तेही त्यांनी एकदोन दिवस सहन केले. परिसरातील वीर हनुमान मित्र मंडळातील कार्यकर्त्यांच्या लक्षात ही बाब आली. रविंद्र कांबळे यांनी पुढाकार घेतला व सहकाराचा एक नवा यज्ञ तिथे सुरू झाला. आता रोज सायंकाळी या परिसरातील एका मोकळ्या जागेत रोज सायंकाळी तब्बल ४०० महिलांचा स्वयंपाक होतो. या महिलांपैकीच काही महिला हा स्वयंपाक करतात. मंडळाचे कार्यकर्ते त्यांना कोरडा शिधा पुरवतात. त्यासाठीचा खर्च स्वतः करतात. रोज साधारण ४ हजार रूपये लागतात. एक दिवस भात एक दिवस चपाती भाजी असे करत या महिला स्वतःला कशाबशा जगवत आहेत.रविंद्र कांबळे म्हणाले, सगळ्या महिला अतीशय गरीब आहेत. फसवणूकीतून या व्यवसायात दाखल झाल्या आहेत. तोच बंद पडल्याने त्यांना कोणी वालीच राहिलेला नाही. वेगवेगळ्या प्रांतामधून त्या आल्या आहेत. मदतीसाठी कोणाकडे जावे तर त्यांचे इथे कोणीही नाही. परिसरातील पोलिस ठाण्याकडून सकाळी चहापाण्याची मदत होते. दुपारी काही स्वयंसेवी संस्थांकडून मिळाली तळ जेवणाची पाकिटे मिळतात. संध्याकाळी होत असणारे त्याचे हाल मात्र आता त्यांच्याच मदतीने कमी करण्यात मंडळाला यश आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसProstitutionवेश्याव्यवसायWomenमहिला