शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

.. ‘ते’ करताहेत गतिमंद, अनाथांसह ज्येष्ठांची अनोखी सेवा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 14:41 IST

त्यांनाही वेगवेगळे  ‘हेअर कट’ करायला आवडते... दाढी एकदम चकाचक साफ असावी असे वाढते...

ठळक मुद्देमोफत सेवा : दर महिन्याला ३०० पेक्षा अधिक जणांचे केस आणि दाढी देतात कापून

पुणे : त्यांनाही वेगवेगळे  ‘हेअर कट’ करायला आवडते... दाढी एकदम चकाचक साफ असावी असे वाटते...पण समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर पडलेल्या ‘त्यां’ची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी पुण्यातील काही तरुण सरसावले आहेत. कर्वे रस्त्यावरील एका हेअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला असून दर महिन्याला गतिमंद विद्यार्थी, Orphanedश्रमातील मुले आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना ही १३ - १४ मुले मोफत सेवा देत आहेत. मातोश्री वृद्धाश्रमासह हिंगणे बुद्रुक येथील गतिमंद मुलांची शाळा आणि कोथरुड येथील अंध मुलींच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ मिळत आहे. मातोश्री वृद्धाश्रमात तर ज्येष्ठ नागरिक या मुलांची आवर्जून वाट पाहत असतात. येथील आजी-आजोबा आपले केस कापून घेतात. मुलांना वेगळ्या काही हेअर स्टाईल करता येतील का याबाबत आवर्जून विचारणाही करतात. विशेषत: आजी आपले केस कापून घेण्यामध्ये आणि आयब्रोज करुन घेण्यात अधिक उत्साही असतात असे इसावी हेअर अकॅडमीचे विजय वाघमारे यांनी सांगितले. यासोबतच ज्येष्ठांची दाढी करणे, त्यांना हव्या त्या आकारात दाढी करुन दिली जाते.गतिमंद मुलांना अन्य मुलांसारखेच राहायला आवडते. त्यांनाही सर्वसामान्य मुलांप्रमाणे वेगवेगळ्या हेअर स्टाईल करायला आवडतात. अकॅडमीतील मुले त्यांच्या शाळेत गेली की या विद्यार्थ्यांचा चेहरा खुलतो. त्यांना विविध हेअर स्टाईलची छायाचित्र असलेले कॅटलॉग दाखविले जातात. त्यांना जी आवडेल ती हेअर स्टाईल करुन दिली जाते. मुले आणि त्यांचे शिक्षकही या उपक्रमामुळे आनंद होतात. या मुलांनी सिंधूताई सपकाळ यांच्या अनाथाश्रमामध्येही मुलांना अशा प्रकारची सेवा दिली आहे. अंध मुलींना दिसत नसले तरी त्या इतरांना दिसत असतात. त्यामुळे आपणही छान दिसावे अशीच या मुलींची इच्छा असते. त्यांच्याही विविध प्रकारच्या हेअरस्टाईल व आयब्रोज केले जातात. या उपक्रमामुळे अकॅडमी शिकणाऱ्या मुलांना आनंद मिळत असल्याचे संचालक शिल्पा जेयामणी यांनी सांगितले. शिक्षणासोबतच सामाजिक भान आणि जबाबदारीची जाव अधिक वृद्धींगत होत असल्याचे जेयामणी म्हणाल्या. 

टॅग्स :PuneपुणेHair Care Tipsकेसांची काळजी