शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

या विकेंडला वर्षाविहाराला जाताय?; पुण्याजवळील या अाठ ठिकाणांचा नक्की विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 6:21 PM

या विकेंडला वर्षाविहारासाठी पुण्याजवळच्या या अाठ ठिकाणांना एकदा भेट द्यायला हवीच.

पुणे : मान्सूनला सुरुवात झाल्याने तरुणांची पाऊले अापाेअाप वर्षाविहाराकडे वळू लागली अाहेत. पावसात भिजत बाईकवरुन जाण्याची मजा काही अाैरच असते. शहरापासून लांब निसर्गात एखाद्या छाेट्याश्या टपरीवरील चहा सर्वांना हवाहवासा वाटताे. तुम्ही जर या विकेंडला वर्षाविहाराला बाहेर पडणार असाल तर ही अाहेत पुण्याजवळील वर्षाविहारासाठीची खास अाठ लाेकेशन्स. या ठिकाणांवर तुम्ही वर्षाविहाराचा मनसाेक्त अानंद लुटू शकता. 

1. ताम्हीणी घाट मुळशी अाणि ताम्हीणीला जाेडणारा असा ताम्हीणी घाट वर्षाविहारासाठी तरुणांच अावडीच ठिकाण अाहे. सह्याद्रीच्या पर्वतरागांमध्ये पडणारा पाऊस, सर्वत्र दिसणारे धबधबे पर्यटकांच्या डाेळ्यांचे पारणे फेडतात. पुण्यातील चांदणी चाैकापासून अवघ्या 40 किलाेमीटर अंतरावर हा घाट अाहे. पावसाळ्यात निसर्गाने पांघरलेली हिरवी चादर पाहण्यासारखी असते. 

2. रांजन खळगेअहमदनगर मधील निघाेज या गावात निसर्गाची  किमया पाहायला मिळते. येथील रांजण खळगे हे जगप्रसिद्ध अाहेत. या ठिकाणी नैसर्गिकरित्या काही कुंड तयार झाले अाहेत. चंद्रावर जसे खड्डे पाहायला मिळतात तसेच खड्डे या ठिकाणी तयार झाले अाहेत. त्यामुळे याला मून लॅंंडही म्हंटले जाते. पुण्यापासून 77 किलाेमीटरवर हे ठिकाण अाहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमधून खळखळणारे पाणी पाहण्यासारखे असते. 

 3.लवासा सिटीतरुणाईच्या अाकर्षणाचं केंद्रबिंदू म्हणजे ही लवासा सिटी. पुण्याच्या मुळशी तालुक्यात हे शहर वसविण्यात अाले असून पुण्यापासून अवघ्या 59 किलाेमीटरवर अाहे. कारने किंवा बाईकवरुन तुम्ही सहज या ठिकाणी जाऊ शकता. तब्बल 8 हजार एकरात वसवलेलं हे शहर वेस्टन कल्चरी अनुभूती देते. रंगबेरंगी घरे, बांध घालून तयार केलेेले छाेटेसे तळे मन माेहून टाकते. लवासाकडे जाण्यासाठी घाट पार करावा लागताे. या घाटात पावसाळ्याच्या दिवसात निख्खळ पांढरे धबधबे वाहतात. हा घाटाचा रस्ता तरुणांना नेहमीच भुरळ घालताे. कार एेवजी टुव्हीलरवर गेल्यास या घाटातून दिसणाऱ्या निसर्गसाैंदर्याचा अधिक अानंद लुटता येताे. झुनका भाकरी साेबतच विविध पदार्थ येथे मिळत असल्याने खवय्यांसाठीही एक वेगळीच मेजवाणी असते. त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स व्हायचे असेल अाणि शांत ठिकाण हवं असेल तर तुम्ही लवासाला भेट नक्कीच द्यायला हवी. 

 

4.खडकवासला धरण पुण्यापासून अवघ्या 15 ते 16 किलाेमीटर अंतरावर खडकवासला धरण अाहे. पावसाळ्यातील येथील नजारा अनाेखा असताे. या ठिकाणी मिळणारी भाजलेली कणसे अाणि कांदा भजी खाण्यासाठी पर्यटकांची माेठी गर्दी असते. खासकरुन विकेंडला हा परीसर तरुणाईने फुलून गेलेला असताे. 

5. मुळशी धरण मुळशी धरणाजवळचा परिसर पावसाळ्यात पाहण्यासारखा असताे. मुळा नदीवर बांधलेले हे एक माेठे धरण अाहे. पावसाळ्यात या ठिकाणचे वातावरण अल्हाददायक असते. 

6. माळशेज घाट'पश्चिम पर्वत रागांमधील माेठ्या डाेंगरांमधून माळशेज घाट जाताे. पावसाळ्यात जागाेजागी धबधबे पर्यटकांना पाहायला मिळतात. पुण्यापासून 120 किलाेमीटर वर हा घाट अाहे. माळशेज घाटातून दिसणारे निसर्गसाैंदर्य पाहण्यासारखे असते. 

7. लाेणावळा भारतीयांबराेबरच परदेशी नागरिकांना भुरळ लाेणावळ्याने घातली अाहे. पुण्यापासून अवघ्या 66 किलाेमीटरवर लाेणावळा अाहे. पाऊस सुरु झाला की तरुणांची पहिली पसंती लाेणावळ्याला असते. येथील धबधबे, धरणं, किल्ले नेहमीच पर्यटकांना अाकर्षिक करत अाली अाहेत. येथील चिक्की सुद्धा प्रसिद्ध अाहे. पावसाळ्यातील लाेणावळ्याचा निसर्गसाैंदर्य प्रत्येकाला हवाहवासा वाटताे. 

8. अॅम्बी व्हॅली सिटी लवासाप्रमाणेच अॅम्बी व्हॅली सुद्धा सुनियाेजितपणे तयार करण्यात अाली अाहे. चाैहाेबाजूंच्या पर्वत रांगांमध्ये ही सिटी अाहे. पुण्यापासून 87 किलाेमीटरवर ही सिटी अाहे. या ठिकाणी सरासरी 4 हजार मिलीमीटर इतका पाऊस पडताे. 

टॅग्स :Puneपुणेtourismपर्यटनlonavalaलोणावळाaamby valleyअ‍ॅम्बी व्हॅली