थेरगावलाही विद्यार्थ्याने घेतला गळफास
By Admin | Updated: May 26, 2016 03:30 IST2016-05-26T03:30:26+5:302016-05-26T03:30:26+5:30
बारावीच्या परीक्षेत सलग दुसऱ्यांदा अपयश आल्याने थेरगाव येथील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय दत्तात्रय विभुते (वय १८, रा. बोरडेनगर, थेरगाव) असे

थेरगावलाही विद्यार्थ्याने घेतला गळफास
वाकड : बारावीच्या परीक्षेत सलग दुसऱ्यांदा अपयश आल्याने थेरगाव येथील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
संजय दत्तात्रय विभुते (वय १८, रा. बोरडेनगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. संजय हा गेल्या वर्षीही बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने यंदा बारावीसाठी बाहेरून परीक्षा दिली होती. दुपारी त्याने आॅनलाइन निकाल पाहिला.
निकाल पाहून घरी आल्यानंतर तो कोणाशी न बोलता आपण पास
झालो असल्याचे त्याने सांगितले. दुपारी त्याची आई त्याला बोलावण्यासाठी खोलीत गेली असता, आतून काहीच प्रतिसाद न आल्याने शेजारील नागरिकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्या वेळी साडीच्या साहाय्याने संजयने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. त्याचे वडील हे सोनाराच्या दुकानाच्या बाहेर गंठण बांधून देण्याचे काम करतात. (वार्ताहर)