शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...म्हणून पुण्यातल्या कॅफे चालकाने थेट इंजिनिअरींगच्या डिग्रीलाच घातला हार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 18:57 IST

पुण्यातील एका कॅफे चालकाकडे मॅकॅनिकल इंजिनिअरींगची डिग्री असताना त्याला याेग्य नाेकरी न मिळाल्याने त्याने थेट अापल्या डिग्रीला हार घालात नाेकरी शाेधायला गेलाे तेव्हा डिग्रीने प्राण साेडल्याचे म्हंटले अाहे.

पुणे :  तरुणांनी व्यावसायिक बना, नवीन काैशल्य अात्मसात करा असे अावाहन सरकराकडून अनेकदा करण्यात येते. विराेधक जेव्हा पंतप्रधान नरेंद्र माेदींना त्यांनी नाेकऱ्यांसंबंधी दिलेल्या अाश्वासनाबद्दल विचारतात तेव्हा नेहमी तरुणांनी नाेकरदार हाेण्यापेक्षा व्यावसायिक हाेण्याचे अावाहन त्यांच्याकडून केले जाते. सगळ्याच क्षेत्रात असलेली बराेजगारी, नाेकऱ्यांची असलेली वानवा याला कंटाळून पुण्यातील 'कडक स्पेशल' या  कॅफेचे मालक 'अजित केरुरे' यांनी थेट अापल्या इंजिनिअरींगच्या डिग्रीलाच हार घालून ती अापल्या कॅफेमध्ये लावली अाहे. तसेच ही डिग्री केवळ लग्न जमावण्याच्या कामी अाली जाॅब शाेधायला गेलाे तेव्हा तिने जीव साेडला हाेता असे त्याने या डिग्री खाली लिहीले अाहे. त्यामुळे पुण्यातील हा 'कडक स्पेशल' कॅफे अाता चर्चेचा विषय झाला अाहे.      देशातील बेराेजगारीचा प्रश्न गंभीर अाहे. माेठ माेठ्या पदव्या घेऊनही तरुणांना नाेकऱ्या मिळत नाहीत. मिळाल्या तरी त्यांच्या शिक्षणा इतका माेबादला त्यांना दिला जात नाही. त्यामुळे लाखाे रुपये खर्चून हवी तशी नाेकरी मिळत नसल्याने तरुण अाता हवालदिल झाले अाहेत. पुण्यातील कडक स्पेशल या कॅफे मालकाची कहाणीही अशीच अाहे. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मॅकॅनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले. डिग्री मिळाल्यानंतर जेव्हा ते जाॅब शाेधण्यासाठी बाहेर पडले तेव्हा त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या लायकीची नाेकरी कुठेच मिळाली नाही. त्यामुळे त्यांची माेठ्याप्रमाणावर निराशा झाली तसेच शिक्षणावर इतका खर्च करुनही नाेकरी मिळत नसेल तर त्या डिग्रीचा काय उपयाेग असा विचार त्यांच्या मनात अाला. त्यांनी नाेकरी एेवजी व्यवसाय करण्याचे ठरवले अाणि पुण्यातील सदाशिव पेठेत कडक स्पेशल हा कॅफे सुरु केला. या कॅफेमध्ये त्यांनी पुणेरी अंदाजातल्या पाट्यांबराेबरच अापली मॅकॅनिकल इंजिनिअरींगची डिग्रीसुद्धा लावली. तिला हार घालून या डिग्रीचा उपयाेग केवळ लग्न जमविण्यासाठी झाला, जेव्हा जाॅब शाेधायला गेलाे हाेताे, तेव्हा डिग्रीने जीव साेडला हाेता असे तिच्या खाली लिहिले अाहे. यातून त्यांनी व्यवस्थेविरुद्धचा राग व्यक्त केला अाहे.     याबाबत बाेलताना, अजित केरुरे म्हणाले, 'मॅकेनिकल इंजिनिअरींगची डिग्री घेतल्यानंतर अनेक ठिकाणी मी जाॅब शाेधला. परंतु माझ्या शिक्षणाच्या लायकीची नाेकरी मला मिळाली नाही. अनेक ठिकाणी प्रयत्न केल्यानंतरही याेग्य नाेकरी न मिळाल्याने मी व्यावसायाकडे वळालाे. सुरुवातीला अनेक व्यावसाय केले त्यात अपयश अाले, त्यानंतर मी हा कॅफे सुरु केला. मॅकॅनिकल इंजिनिअरींगची डिग्री मिळवून सुद्धा कुठेही याेग्य नाेकरी न मिळाल्याने झालेल्या चिडचिडीतून मी माझी इंजिनिअरींगची डिग्री कॅफेमध्ये लावली व तिने प्राण साेडल्याचे म्हंटले. यातून मला शिक्षणाला किंवा डिग्रीला कुठेही कमी लेखायचे नाही. परंतु इतके शिक्षण घेऊनही तरुणांना याेग्य पगाराची नाेकरी मिळत नाही या प्रश्नाकडे मला लक्ष वेधायचे अाहे. लाखाे रुपये खर्चून केवळ दहा पंधरा हजाराची नाेकरी अाज तरुणांना करावी लागत अाहे. त्यामुळे नाेकरीच्या अनेक संधी उपलब्ध हाेणे गरजेचे अाहे. '

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नsadashiv pethसदाशिव पेठjobनोकरी