पुण्यातील कचरागाडी मोशीत फिरकू देणार नाही
By Admin | Updated: September 17, 2014 00:40 IST2014-09-17T00:40:40+5:302014-09-17T00:40:40+5:30
‘‘पुणो महापालिका हद्दीतील कचरा मोशी कचरा डेपोत आणण्याचा पुणो महापालिका प्रशासनाने घाट घातला आहे.

पुण्यातील कचरागाडी मोशीत फिरकू देणार नाही
भोसरी : ‘‘पुणो महापालिका हद्दीतील कचरा मोशी कचरा डेपोत आणण्याचा पुणो महापालिका प्रशासनाने घाट घातला आहे. मात्र, त्यांचा हा प्रय} कोणत्याही परिस्थितीत हाणून पाडू. यासाठी पुण्यातील कच:याची एकही गाडी येथे फिरकू देणार नाही’’, असा इशारा भोसरीचे आमदार विलास लांडे यांनी दिला.
पुणो महापालिकेचा कचरा मोशी डेपोत टाकण्याचा प्रस्ताव पुणो पालिकेने तयार केला आहे. मोशी परिसर हा भोसरी मतदारसंघात येतो. सद्या झपाटयाने विकसित होणारा हा परिसर आहे. त्यामुळे पुण्याचा कचरा मोशीत टाकण्याचा हा प्रस्ताव मान्य झाल्यास येथील प्रस्तावित कंपन्या आणि गृहप्रकल्पांना अडचणी निर्माण होऊ शकतो शिवाय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.
पुणो महापालिकेने तयार केलेला प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी लांडे यांनी केली आहे. सद्या पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा मोशी डेपोत टाकण्यात येतो. हा कचरा डेपो स्थलांतरीत करावा, अशी मागणी मी गेल्या चार ते पाच वर्षांपासून शासन दरबारी लावून धरलेली आहे. मोशी परिसरातील नागरिकांची देखील कचरा डेपो स्थलांतरीत करावी ही मागणी आहे. आम्ही केलेल्या मागणीची काही महिन्यांपूर्वीच शासनाने दखल घेतली असून कचरा डेपोच्या स्थलांतरणाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. याचाच एक भाग म्हणून कचरा डेपो परिसरात पुर्वी असलेली बफर झोनची हद्द कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतल्यामुळे या ठिकाणी विकासकामांना सुरूवात झाली आहे. या ठिकाणाहून जवळच शासनाचे तसेच महापालिकेचे अनेक प्रकल्प सुरू आहेत.
अनुसूचित जातीच्या मुला मुलींचे वस्तीगृह तसेच आदिवासी विद्याथ्र्यांसाठी वस्तीगृह होत आहे. याशिवाय न्यायालय, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र, आरटीओ कार्यालय, उपबाजार समिती यासह अनेक प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांना चालना देण्यासाठी आमदार या नात्याने मी प्रय}शील आहे.
मोशीचा कचरा डेपो स्थलांतरीत करण्याचा आमचा आग्रह असून पुणो महापालिकेने नाहक प्रस्ताव तयार करून येथील नागरिकांमध्ये गैरसमज पसरवू नयेत, अशी मागणीही लांडे यांनी केली आहे.
पुणो, पिंपरी-चिंचवड पालिका तसेच राज्य पातळीवर सत्ता कोणाचीही असो पुण्याचा कचरा मोशी डेपो कदापीही टाकू देणार नाही. सध्या आंदोलन शांततामय पद्धतीने सुरू असले तरी वेळप्रसंगी कोणत्याही थराला जाऊन आपण पुण्यातील कचरा मोशी डेपोत टाकू देणार नाही,’’ असे ते म्हणाले. (वार्ताहर)