शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा तर होणारच...  बारामतीत पोलीस अन् वकीलांमध्ये हाणामारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 19:21 IST

शुक्रवारी(दि १५) दुपारी १२.३० च्या सुमारास सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात  आरोपी न्यायालयात हजर करण्यात आले होते.यावेळी एका पोलिस कर्मचाºयाकडुन शुटींग केले जात होते.

पुणे - बारामती शहरात नगरपरीषदेच्या  सेवा रस्त्याच्या कामात  अडथळा आणल्याप्रकरणी भाजप नेते प्रशांत सातव , एका वकील यांच्यासह गुरुवारी(दि१४) अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या न्यायालयीन कामासाठी त्यांना शुक्रवारी (दि १५) न्यायालयात  हजर करण्यात आलेहोते. यावेळी व्हीडीओ शुटींग करण्यावरुन पोलीस आणि वकील यांच्यात वाद झाला. यावेळी पोलीस आणि वकिलांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर त्याचेपर्यावसन हाणामारीमध्ये झाले. मात्र, सामोपचाराने हे प्रकरण मिटविण्यात आले.

शुक्रवारी(दि १५) दुपारी १२.३० च्या सुमारास सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात  आरोपी न्यायालयात हजर करण्यात आले होते.यावेळी एका पोलिस कर्मचाºयाकडुन शुटींग केले जात होते. यावेळी न्यायालयाच्या आवारात व्हिडीओ शुटींग करण्यावर काही वकीलांनी आक्षेप घेतला. त्यानंतर या प्रकरणाची सुरुवात झाली. या नंतर पोलिस व वकीलांमध्ये  चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी वाद वाढल्याने वातावरण तणावपुर्ण झाले. याच तणावात शाब्दीक वादाचे न्यायालयाच्या आवारातच हाणामारीमध्ये रुपांतर झाले. पोलीस आणि काही वकीलांमध्ये यावेळी धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचीदेखील शहरात चर्चा होती. या प्रकरणात अनेक वकीलांना मात्र पोलिसांच्या काठ्यांचा मार बसला. तसेच, एका वकीलाच्या कानालाही यामध्ये जखम झाल्याचे समजते. या घटनेची माहिती शहरात वाऱ्याप्रमाणे पसरली.  त्यानंतर न्यायालय परीसरात मोठी गर्दी झाली होती. यावेळी काही वकीलांना पोलिसांनी ताब्यात घेवुन शहर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी  वरिष्ठ पोलिस अधिकारी व ज्येष्ठ वकील यांनी आपसात चर्चा केली. विविध मुद्दयांवर चर्चा करुन हे   प्रकरण आपसात मिटविण्यात आले. याप्रकरणी पोलिस व वकील यांच्यात काही दिवसानंतर संयुक्त बैठक घेण्याचेही ठरल्याची माहिती पुढे येत आहे. चर्चेतुन प्रकरण मिटविल्याने  याप्रकरणी पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीPoliceपोलिस