शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातून चंदीगड व इंदौर शहरांसाठी थेट विमान उड्डाण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 21:16 IST

पुण्यातून चंदीगड व इंदौर शहरांसाठी थेट विमान उड्डाण होणारपुणे : पुण्याला लवकरच चंदीगड व इंदौर शहरांसाठी विमान उड्डाण होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) या विमान उड्डाणांना मान्यता दिली आहे.

पुण्यातून चंदीगड व इंदौर शहरांसाठी थेट विमान उड्डाण होणारपुणे : पुण्याला लवकरच चंदीगड व इंदौर शहरांसाठी विमान उड्डाण होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) या विमान उड्डाणांना मान्यता दिली आहे. त्यानुसार चंदीगडचे उड्डाण १५ मार्चला तर इंदौरचे उड्डाण १ मे रोजी होणार आहे.मागील वर्षी चंदीगड व इंदौर या शहरांसाठी असलेली विमानसेवा बंद झाली होती. त्यामुळे प्रवाशांकडून सातत्याने नवीन विमानसेवेची मागणी केली जात होती. आता इंडिगो कंपनीकडून दोन्ही शहरांसाठी ही सेवा सुरू केली जाणार आहे. दि. १५ मार्च रोजी सकाळी ११.३५ वाजता चंदीगड विमानतळावरून पहिल्या विमानाचे उड्डाण होईल. हे विमान दुपारी २.०५ वाजता पुण्यात पोहचेल. तर तेच विमान पुणे विमानतळावरून दुपारी ३.३५ वाजता उड्डाण करून सायंकाळी ६.०५ वाजता चंदीगढमध्ये उतरेल. इंदौर विमानतळावरून दि. १ मे रोजी रात्री ११.२५ वाजता विमान पुण्याकडे रवाना होईल. हे विमान दि. २ मे रोजी मध्यरात्री १२.४० वाजता पुण्यात येईल. तर मध्यरात्री १.२५ वाजता पुणे विमानतळावरून उड्डाण करून २.३० वाजता चंदीगढमध्ये दाखल होईल.

चंदीगढ व इंदौर या दोन्ही शहरांसाठी विमानसेवा सुरू झाल्यानंतर दोन्ही शहरांसह पुण्यातील उद्योग-व्यवसायाला एकप्रकारची चालना मिळणार आहे. या क्षेत्रातील प्रवाशांना थेट विमानसेवा उपलब्ध होणार असल्याने त्याचा चांगला प्रतिसादही मिळेल, अशी अपेक्षा विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाchandigarh-pcचंडीगढ़indore-pcइंदौर