शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

पाकला धडा शिकविण्याची गरज होती- लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 04:22 IST

सरहदच्या वतीने निंभोरकर यांचा सन्मान

पुणे : दरवेळी भारताच्या सहनशक्तीचा गैरफायदा घेऊन शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईक नंतर भारताचा धसकाच घेतला. सर्जिकल स्ट्राइकपूर्वी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरी येथील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात १७ जवान हुतात्मा झाले होते. एकदा तरी पाकिस्तानला धडा शिकवणे आवश्यक होते, असे स्पष्ट मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) यांनी व्यक्त केले.सरहदच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कारगिल विजय दिनानिमित्त सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्त्व करणारे निंभोरकर, कारगिल युध्दातील नायक कर्नल (निवृत्त) ललित राय यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी, महापौर मुक्ता टिळक, सरहद चे संस्थापक संजय नहार, शैलेश वाडेकर, अरविंद बिजवे आदी यावेळी उपस्थित होते.आतापर्यंत आपणच भारतात घुसखोरी करू शकतो. भारत तसे करणार नाही, असा पाकिस्तानचा समज होता. पण केवळ जागतिक ख्यातीच्या गुप्तचर संस्थाच नव्हे तर भारतीय लष्करही सर्जिकल स्ट्राइक करू शकते, हे सर्जिकल स्ट्राइकमुळे सिद्ध झाले. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी लष्कराला सोडायची नव्हती. आमच्याकडून नियोजन सादर केले आणि त्यानंतर परवानगी मिळाली. त्याची कल्पना केवळ आठ ते दहा व्यक्तींनाच होती. प्रत्येकी ३५ पॅरा कमांडोच्या तीन तुकड्या रात्रीच्या अंधारात आत पाठवल्या. पहाटेच्या वेळी गाढ झोपेच्या वेळी शत्रू अधिक बेसावध असेल हा विचार करुन हल्ला केला गेला, असे निंभोरकर यांनी सांगितले.चार दिवस अन्नपाण्याविना लढलोकर्नल राय म्हणाले, तीन रात्र चार दिवस आम्ही अन्न-पाण्याशिवाय लढत होतो. ६०० जवानांच्या तुकडीतील प्रत्येकजण शेवटच्या श्वासापर्यंत लढला. कारगिलच्या युद्धात उणे ३५ अंश तापमानात मोठ्या धाडसाने आणि जिद्दीने चढाई केली. त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे सगळे शक्य झाले.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनPakistanपाकिस्तानwarयुद्धIndian Armyभारतीय जवान