पाकला धडा शिकविण्याची गरज होती- लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 04:21 AM2018-07-27T04:21:24+5:302018-07-27T04:22:36+5:30

सरहदच्या वतीने निंभोरकर यांचा सन्मान

There was a need to teach the lessons learned- Lieutenant General Rajendra Nimbalkar | पाकला धडा शिकविण्याची गरज होती- लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

पाकला धडा शिकविण्याची गरज होती- लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

Next

पुणे : दरवेळी भारताच्या सहनशक्तीचा गैरफायदा घेऊन शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईक नंतर भारताचा धसकाच घेतला. सर्जिकल स्ट्राइकपूर्वी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरी येथील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात १७ जवान हुतात्मा झाले होते. एकदा तरी पाकिस्तानला धडा शिकवणे आवश्यक होते, असे स्पष्ट मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) यांनी व्यक्त केले.
सरहदच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कारगिल विजय दिनानिमित्त सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्त्व करणारे निंभोरकर, कारगिल युध्दातील नायक कर्नल (निवृत्त) ललित राय यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी, महापौर मुक्ता टिळक, सरहद चे संस्थापक संजय नहार, शैलेश वाडेकर, अरविंद बिजवे आदी यावेळी उपस्थित होते.
आतापर्यंत आपणच भारतात घुसखोरी करू शकतो. भारत तसे करणार नाही, असा पाकिस्तानचा समज होता. पण केवळ जागतिक ख्यातीच्या गुप्तचर संस्थाच नव्हे तर भारतीय लष्करही सर्जिकल स्ट्राइक करू शकते, हे सर्जिकल स्ट्राइकमुळे सिद्ध झाले. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी लष्कराला सोडायची नव्हती. आमच्याकडून नियोजन सादर केले आणि त्यानंतर परवानगी मिळाली. त्याची कल्पना केवळ आठ ते दहा व्यक्तींनाच होती. प्रत्येकी ३५ पॅरा कमांडोच्या तीन तुकड्या रात्रीच्या अंधारात आत पाठवल्या. पहाटेच्या वेळी गाढ झोपेच्या वेळी शत्रू अधिक बेसावध असेल हा विचार करुन हल्ला केला गेला, असे निंभोरकर यांनी सांगितले.

चार दिवस अन्नपाण्याविना लढलो
कर्नल राय म्हणाले, तीन रात्र चार दिवस आम्ही अन्न-पाण्याशिवाय लढत होतो. ६०० जवानांच्या तुकडीतील प्रत्येकजण शेवटच्या श्वासापर्यंत लढला. कारगिलच्या युद्धात उणे ३५ अंश तापमानात मोठ्या धाडसाने आणि जिद्दीने चढाई केली. त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे सगळे शक्य झाले.

Web Title: There was a need to teach the lessons learned- Lieutenant General Rajendra Nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.