दुरुस्तीमुळे गुरुवारी पुण्यात पाणी नाही

By Admin | Updated: May 23, 2017 05:38 IST2017-05-23T05:38:59+5:302017-05-23T05:38:59+5:30

पर्वती, वडगाव, एसएनडीटी-वारजे, होळकर ब्रिज या महापालिकेच्या जलकेंद्रांत वीज तसेच अन्य दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रातील परिसरात गुरुवारी

There is no water in Pune on Thursday due to amendment | दुरुस्तीमुळे गुरुवारी पुण्यात पाणी नाही

दुरुस्तीमुळे गुरुवारी पुण्यात पाणी नाही

पुणे : पर्वती, वडगाव, एसएनडीटी-वारजे, होळकर ब्रिज या महापालिकेच्या जलकेंद्रांत वीज तसेच अन्य दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रातील परिसरात गुरुवारी (दि. २५) पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवारीही (दि. २६) सकाळी कमी दाबाने व उशिरा पाणीपुरवठा होईल.
पाणीपुरवठा बंद राहणार असलेला जलकेंद्रनिहाय परिसर याप्रमाणे : पर्वती जलकेंद्र- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, मुकुंदनगर, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड, एरंडवणा, कोथरूड, तळजाई, डहाणूकर कॉलनी, लॉ कॉलेज रोड, कोंढवा खुर्द.
वारजे जलकेंद्र- पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, भुसारी कॉलनी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ, सूस, सुतारवाडी, भूगाव.
लष्कर जलकेंद्र- लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगरररस्ता, कल्याणीनगर, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, नवीन होळकर ब्रिज- विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोगवा, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड.

Web Title: There is no water in Pune on Thursday due to amendment