राजकीय हस्तक्षेप नकोच
By Admin | Updated: May 16, 2015 04:17 IST2015-05-16T04:17:23+5:302015-05-16T04:17:23+5:30
महापालिकेच्या वतीने चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या संत तुकाराम महाराज संतपीठाविषयी चर्चा करण्यासाठी महापालिकेतील स्थायी समिती
_ns.jpg)
राजकीय हस्तक्षेप नकोच
पिंपरी : महापालिकेच्या वतीने चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या संत तुकाराम महाराज संतपीठाविषयी चर्चा करण्यासाठी महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात बैठक झाली. मूल्याधिष्ठित संस्कार देणारे संतपीठ उभारताना राजकीय हस्तक्षेप होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यास उपस्थितांनीही अनुमोदन दिले. या बैठकीत धोरणांवर चर्चा झाली.
बैठकीस महापौर शकुंतला धराडे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ज्ञानप्रबोधिनीचे प्रमुख वा. ना. अभ्यंकर, ह. भ. प. मारुतीमहाराज कुऱ्हेकर, ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर, आयुक्त राजीव जाधव, आमदार महेश लांडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, पक्षनेत्या मंगला कदम, शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, नगरसेवक दत्तात्रय साने, नगरसेविका स्वाती साने, यशवंत लिमये, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर, कायदा सल्लागार अॅड. सतीश पवार, उपमुख्य लेखापाल संजय गवळी, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
महापालिका सर्वसाधारण सभेत एक वेळा तहकूब ठेवलेला संतपीठाचा विषय बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ऐन वेळेसचा विषय म्हणून मंजूर करण्यात आला. महासभेने या विषयास मंजुरी दिल्यानंतर या विषयावर चर्चा करण्यासाठी आज बैठकीचे आयोजन केले होते. महापालिकेच्या वतीने अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत आहे,
यावर विश्वासच बसत नाही,
अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ
कीर्तनकारांनी सुरुवातीला दिली व उपक्रमाबद्दल महापालिकेचे कौतुक केले. (प्रतिनिधी)