शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

" अजित पवारांसारखा वेळ पाळणारा अन् दिलेल्या शब्दाला जागणारा दुसरा माणूस नाही, पण... " ; चंद्रकांत पाटलांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 13:55 IST

प्रत्येक विषयातच त्यावेळची वेळ मारून नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने सुरु आहे.

पुणे : अजित पवारांसारखा वेळ पाळणारा आणि शब्दाला जागणारा दुसरा माणूस नाही अशी ओळख आहे. पण आता एमपीएससीच्या जागा भरण्याबाबत विधिमंडळात दिलेला शब्द जर ते फिरवत असतील तर मग कठीण आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना जोरदार टोला लगावला आहे. 

पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधिमंडळ ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता ते जर आपण दिलेल्या शब्दावरून पलटी मारत असतील तर मग कठीण आहे. असे प्रत्येक विषयातच त्यावेळची वेळ मारून नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने सुरु आहे. हे अत्यंत खोटारडं सरकार आहे. निवडणूक होईपर्यंत हे सर्व चालतं, पण नंतर कळतं. महाविकास आघाडी सरकारला लोक धडा शिकवतील.

यापुढे असं केलं तर खपवून घेणार नाही; पाटलांचा इशारा मेट्रो कंपनीचा आम्ही निषेध करतो. अशा प्रकारे दबावाखाली काम करायचं असेल तर आम्हालाही दबाव टाकता येतो. मोदींनी सर्व परवानग्या दिल्या, केंद्राने ११ हजार कोटी दिले आणि मोदींचा साधा फोटोही नाही ? आम्ही काय फुकटचं मागतोय का? तुम्हाला सगळं फुकट हवंय.  माझ्या मतदारसंघात कार्यक्रम घेऊन मी नाही तिथे?  यापुढे असं केलं तर खपवून घेणार नाही असा गर्भित इशारा  चंद्रकांत पाटलांनी दिला आहे.  

काय आहे प्रकरण... एमपीएससीची लेखी परीक्षा उत्तीर्ण होउन दोन वर्ष पदे न भरल्याने स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने पुण्यातील फुरसुंगी येथे राहत्या घरी आपले जीवन संपवले होते. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. तसेच भाजपने देखील विधिमंडळात महाविकास आघाडी सरकारला जोरदार लक्ष केले होते. मात्र, याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ३१ जुलै २०२१ पर्यंत रिक्त जागा भरण्यात येणार असल्याची जाहीर घोषणा केली होती. विधिमंळात केलेल्या घोषणेला कायदेशीर महत्व प्राप्त होते. दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उपमुख्यमंत्र्यांना या घोषणेचा विसर पडला आहे का ? असा संतप्त सवाल स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी उपस्थित केला जात आहे. 

 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवार