शिक्षण विभागासाठी नवीन योजना नाहीच
By Admin | Updated: January 15, 2015 00:31 IST2015-01-15T00:31:27+5:302015-01-15T00:31:27+5:30
राज्य शासनाच्या आदेशानुसार शिक्षण मंडळाचा प्रशासकीय कारभार महापालिका आयुक्तांच्या अधिकाराखाली सोपविण्यात आला आहे.

शिक्षण विभागासाठी नवीन योजना नाहीच
पुणे : राज्य शासनाच्या आदेशानुसार शिक्षण मंडळाचा प्रशासकीय कारभार महापालिका आयुक्तांच्या अधिकाराखाली सोपविण्यात आला आहे. त्यानुसार यंदा पहिल्यांदाच महापालिकेकडून शिक्षण विभागाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. मात्र, शिक्षण विभागासाठी कोणत्याही नवीन योजनांचा समावेश अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेला नाही.
महापालिकेच्या ३०० शाळांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण मंडळाकडे या शाळांचा कारभार असताना त्यांच्या अंदाजपत्रकांमध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अनेक नवनवीन योजना सादर केल्या जात होत्या. महापालिकेने सादर केलेल्या २०१५-१६ च्या अंदाजपत्रकामध्ये मात्र काहीच विशेष तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत.
मागील वर्षी सायकलवाटप, इंटरनेट सुविधा, सॅनिटरी नॅपकीन वाटप अशा अनेक योजना राबविण्यात आल्या होत्या.
महापालिकेच्या अवाढव्य कारभारात शिक्षण विभागाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची भीती व्यक्त होत आहे.