शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

यापुढे रस्त्यावर आंदोलन नाही, मराठा क्रांती मोर्चाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 05:39 IST

क्रांती मोर्चाचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगत यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी सांगण्यात आले.

पुणे : महाराष्ट्र बंदच्या आंदोलनात गैरवर्तन करणारे समाजकंटक असून त्यांचा क्रांती मोर्चाचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगत यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी सांगण्यात आले. १५ आॅगस्ट रोजी घरोघर चूलबंद ठेऊन अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर मागण्या मान्य होईपर्यंत चक्री उपोषण केले जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.९ आॅगस्ट रोजीच्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक झाली. चांदणी चौकातही हिंसक वळण लागले. या प्रकारचे गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तींशी आपला संबंध नाही. यामध्ये बाहेरच्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.मराठा क्रांती मोर्चाकडून यापुढील काळातही आंदोलने शांततापूर्ण, अहिंसक व लोकशाही मार्गाने आयोजित केली जाणार आहेत. अन्य कोणत्याही व्यक्तींनी अथवा नेत्यांनी स्वतंत्रपणे कुठलेही आंदोलन करू नये. तसा कोणी प्रयत्न केल्यास त्यांचा आणि मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाचा कोणताही संबंध राहणार नाही ,असे मराठा मोर्चाचे समन्वयक शांतराम कुंजीर, विकास पासलकर, बाळासाहेब अमराळे, सचिन आडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.>तोडफोडीची नुकसानभरपाई देणारजिल्हाधिकारी कार्यालय येथे गुरुवारी आंदोलन सुरू असताना तिथल्या सुरक्षा रक्षकांच्या केबिनची काच फुटली. याची भरपाई दिली जाणार आहे. त्याचबरोबर काही बाहेरच्या व्यक्तींनी पत्रकार व पोलिसांशी गैरवर्तन केले, त्याबद्दल समन्वयकांनी दिलगिरी व्यक्त केली.>सीआयडी चौकशी करा : वाळूज एमआयडीसीमधील जवळपास ६० कंपन्यांत झालेली तोडफोड आणि हिंसक घटनांशी आमचा संबंध नाही. त्यामुळे या घटनांचा सीआयडीमार्फत तपास करावा, अशी मागणी मराठाक्र ांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी औरंगाबाद येथे केली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठा