माझ्या तालुक्यात दारू धंदे नकोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST2021-09-06T04:14:49+5:302021-09-06T04:14:49+5:30

बारामती : बारामतीजवळ कटफळ येथे आयोजित कार्यक्रमात ते अधिकाऱ्यांकडून ड्रोन भूमापन सर्व्हेची माहिती घेत असताना एका तळीरामाने एन्ट्री ...

There is no liquor business in my taluka | माझ्या तालुक्यात दारू धंदे नकोत

माझ्या तालुक्यात दारू धंदे नकोत

बारामती : बारामतीजवळ कटफळ येथे आयोजित कार्यक्रमात ते अधिकाऱ्यांकडून ड्रोन भूमापन सर्व्हेची माहिती घेत असताना एका तळीरामाने एन्ट्री करीत थेट पवार यांचे पाय पकडले. लोक दुपारीच चंद्रावर जायला लागलेत, त्यामुळे माझ्या तालुक्यात दारू धंदे नकोत अशी तंबी पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिली.

कटफळ येथे शनिवारी (दि. ४) कार्यक्रमात ड्रोन भूमापन सर्व्हेची माहिती पवार घेत असताना एक तळीराम गर्दीतून वाट काढत डुलतच पवार यांच्या समोर आला. त्यांच्या पायाही पडला. त्याला लागलीच बाजूला करण्यात आले. बोल बाबा, आज काय दुपारीच चंद्रावर.. काय चाललेय काय, अशी विचारणा पवार यांनी केली. दारुड्यांमुळे गावात त्रास होत असल्याने दादा दारू धंदे बंद करायला पोलिसांना सांगा, अशी मागणी खाली बसलेल्या एका कार्यकर्त्याने केली. त्यावर पवार यांनी अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर आहेत का दौऱ्यात अशी विचारणा केली. भाषणात आता दुपारीच एकजण चंद्रावर गेला होता. त्याला म्हटलं, अरे अजून दुपार आहे. आज शनिवार आहे, तर काय आता करता. काही जण व्यसनाधीन झाल्यावर पुढे त्रास होतो. त्यांना व्यसनापासून बाजूला करण्याचे काम आपण सगळ्यांनी केले पाहिजे, असे सांगत माझ्या तालुक्यात दारू धंदे नकोत, अशा धंद्यांवर कारवाई करा, असे आदेश पवार यांनी दिले.

------------------

७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन...

राज्याचे हिवाळी अधिवेशन सात डिसेंबरपासून सुरू होणार आहे. विकासकामांसाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करीत ते माझ्यासमोर सादर करा. म्हणजे पुरवणी मागण्यांमध्ये त्याचा समावेश करता येईल, असे आदेश पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

------------------------

फोटो ओळी : कटफळ येथील कार्यक्रमादरम्यान एका तळीरामाने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पाय धरले.

०५०९२०२१-बारामती-०३

Web Title: There is no liquor business in my taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.