अनुकूल ढग नसल्याने विमान आलेच नाही
By Admin | Updated: September 18, 2015 02:06 IST2015-09-18T02:06:38+5:302015-09-18T02:06:38+5:30
पुण्यातील धरण क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या मोहिमेला अजूनही मुहूर्त मिळत नाही. हवाई दलाच्या परवानग्यांचे सोपस्कार पार पडले असले तरी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी

अनुकूल ढग नसल्याने विमान आलेच नाही
पुणे : पुण्यातील धरण क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या मोहिमेला अजूनही मुहूर्त मिळत नाही. हवाई दलाच्या परवानग्यांचे सोपस्कार पार पडले असले तरी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी अनुकूल ढग नसल्यामुळे हे विमान आज गुरुवारीही पुण्यात येऊ शकले नाही. ते शुक्रवारी येण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वर्तविली जात आहे.
रात्री उशिरानंतर परवानग्यांचा सोपस्कार पूर्ण झाल्यामुळे गुरुवारी विमान पुण्यात येईल. अशी आशा होती. पण हवामान विभागाने पुण्याच्या धरण क्षेत्रात हा कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी अनुकूल वातावरण नसल्याचा अहवाल संबंधितांना दिल्यामुळेही आज पुण्यात हा प्रयोग राबविता आला नाही़ त्यामुळे विमान उतरविण्यास तांत्रिक परवानगी मिळाली असली तरी हा कृत्रिम पाऊस पाडण्यास निसर्ग जेव्हा अनुकूल असेल तेंव्हाच हा प्रयोग केला जाणार आहे.
पुण्याच्या धरण क्षेत्रात म्हणजेच खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव, भाटघर, डिंभे या धरणासह जिल्ह्यातील छोट्या-मोठया २४ प्रकल्पांमध्ये कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे. आता अनुकूल ढग उपलब्ध व्हावेत आणि प्रयोग धरणक्षेत्रात व्हावा, अशी अपेक्षा आहे़