तमाशाच्या राहुटीला अनुदानाचेही नाही ठिगळ

By Admin | Updated: July 3, 2014 05:56 IST2014-07-03T05:56:31+5:302014-07-03T05:56:31+5:30

लोकसंस्कृती टिकविण्यासाठी लोककलांना राज्य शासनाकडून अनुदान देण्यास सुरुवात झाली आहे.

There is no donation of grains in the tamasha tree | तमाशाच्या राहुटीला अनुदानाचेही नाही ठिगळ

तमाशाच्या राहुटीला अनुदानाचेही नाही ठिगळ

धनश्री भावसार-बगाडे, पुणे
लोकसंस्कृती टिकविण्यासाठी लोककलांना राज्य शासनाकडून अनुदान देण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील करमणुकीचे साधन असलेल्या आणि अस्सल मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या तमाशाच्या राहुटीला मात्र अनुदानाचे ठिगळही मिळेनासे झाले आहे. तब्बल सहा वर्षांपासून तमाशा फडांना अनुदान मिळालेले नाही.
राज्य शासनाच्या १ जानेवारी २००८ च्या अध्यादेशानुसार लोककलेच्या जतन व विकासासाठी भांडवली व प्रायोगिक अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. ही घोषणा झाल्यावर लोककलावंतांनी आनंद व्यक्त केला होता. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तताही करण्यात आली होती. मात्र, आदेश निघाल्यानंतरही अर्जांची तपासणी करण्यासाठी समिती नेमण्यासाठीच चार वर्षे लागली. त्यातही समितीला संबंधित लोककलेची चाचणी घेण्यासाठी वेळ मिळेना. तमाशाच्या संगीतबारींची चाचणी नुकतीच झाली. आता ही समिती आपला अहवाल सादर करणार, त्यावर मंत्रालय पातळीवर निर्णय होऊन सगळे प्रशासकीय सोपस्कार होऊन मग कलावंतांना अनुदान मिळणार आहे.
तमाशा फडमालक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर म्हणाले, ‘‘तमाशा फडांना गेली ६ वर्षे हे अनुदान मिळालेले नाही. परंतु, यंदा देणार असल्याचे आश्वासन शासनाने आम्हाला दिले असून, ३० आॅगस्टच्या अगोदर अनुदान मिळणार असल्याचे सांगितले आहे. त्याच्यासाठी चाचणी आता झाली. त्यामुळे अनुदान कधी मिळणार, हा प्रश्नच आहे.’’
राज्याच्या सांस्कृतिक संचलनालयाचे सहसंचालक मनोज सानप म्हणाले, ‘‘अनुदानासाठी यंदा १४ संगीतबारी, ४ शाहीर व २३ खडीगंमतचे अर्ज आले होते. त्यापैकी खडीगंमतची चाचणी वर्षभरापूर्वी नागपूर येथे झाली असून, संगीतबारीची पुण्यात नुकतीच चाचणी झाली.
यापैकी एक संगीतबारी अनुपस्थित असून, ३ संगीतबारींचे सादरीकरण शासनास न आवडल्याने त्यांना सुधारण्याची संधी देत या चार संगीतबारींची पुन्हा एकदा चाचणी घेण्यात येणार आहे.’’
सांस्कृतिक संचालनालयाचे अधीक्षक नीलेश धुमाळ म्हणाले, ‘‘ भांडवली अनुदान पूर्णवेळ तमाशाला २ लाख रुपये, हंगामी तमाशाला १ लाख रुपये, खडीगंमत व शाहिरीला ५० हजार रुपये, तर संगीतबारीला २५ हजार रुपयांचे देण्यात येते.’’

Web Title: There is no donation of grains in the tamasha tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.