शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

'बेफिकीरी' शब्दप्रयाेगाने संभाजी महाराजांचा अपमान हाेत नाही; सुबाेध भावेंचे वादावर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 19:50 IST

'अाणि डाॅ. काशीनाथ घाणेकर' या चित्रपटातील वादावार बाेलताना बेफिकीरी हा शब्दप्रयाेग वेगळ्या अर्थाने केला असल्याचे स्पष्टीकरण अभिनेता सुबाेध भावे याने दिले.

पुणे :  बेफिकीरी हा शब्दप्रयाेग सिनेमामध्ये वेगळ्या अर्थाने वापरण्यात अाला अाहे. या शब्दामुळे संभाजी महाराजांचा अपमान हाेत नसल्याचा खुलासा अभिनेता सुबाेध भावे याने केला अाहे. सुबाेध भावे यांची प्रमुख भूमिका असलेला 'अाणि डाॅ. काशीनाथ घाणेकर' हा चित्रपट 8 नाेव्हेंबर राेजी प्रदर्शित हाेणार अाहे. या चित्रपटात "ही बेफिकीरी हाच तुमचा संभाजी..." असा उल्लेख आहे." यावर संभाजी ब्रिगेडने अाक्षेप घेतला हाेता. तसेच या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली हाेती. भावे म्हणाले, बेफिकीरी हा शब्दप्रयाेग चित्रपटामध्ये वेगळ्या अर्थाने वापरण्यात अाला अाहे. संभाजी महाराजांनी आजूबाजूला असणा-या शत्रुंची फिकीर केली नाही, कुठल्या मोठ्या संकटात सापडले तरी याची फिकीर केली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर सर्वांना एकत्र घेऊन पुढचे काही वर्षे ते औरंगजेब आणि इतरांशी बेधडकपणे झुंझत राहिले आणि इतरांनाही लढायला शिकवले. आणि त्याला अनुसरूनच बेफिकीरी हा शब्दप्रयोग चित्रपटात करण्यात आला आहे. या शब्दातून संभाजी महाराजांचं लढवय्येपण आपल्या डोळ्यासमोर येतं. यामुळे त्यांचा अपमान होतो असे मला वाटत नाही. 

        पुढे बाेलताना भावे म्हणाले, हा चित्रपट संभाजी महाराजांवर नसून डाॅ. काशिनाथ घाणेकर यांच्यावर अाधारीत अाहे. त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकांवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात अाला अाहे. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातील काही प्रसंग या चित्रपटात अाहेत. ते प्रसंग चित्रपटात का अाहेत. हे चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे चित्रपट न पाहताच कुणाच्या मनात काही गैरसमज असतील तर ते काढून टाका. शिवाजी महाराज अाणि संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत अाहेत. त्यांचा अपमान करणे किंवा त्यांना कमी लेखने असे कुठल्याही कृत्यात अामची टीम सहभागी हाेणार नाही. 

टॅग्स :PuneपुणेSubodh Bhaveसुबोध भावे sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडBiopicआत्मचरित्र