शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात एकही काेराेनाचा रुग्ण नाही ; अफवांवर विश्वास ठेवून नका : जिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 19:49 IST

पुण्यात काेराेनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात 'कोरोना'चा एकही संशयीत रुग्ण नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. या विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, 'कोरोना' व्हायरस बाबत सोशल मीडियावर अफवा पसरविल्या जात आहे, त्यावर विश्वास ठेवू नये. इतर संसर्गजन्य रोगाच्या बाबतीत आपण जी काळजी घेतो, तशीच खबरदारी सर्वांनी घ्यावी. साबणाने हात धुणे, मास्क वापरणे याबाबत दक्षता घ्‍यावी. शिंकणे, खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या वाटे या विषाणूचा प्रसार होतो. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक शिष्टाचार पाळणे आवश्यक असून खोकतांना, शिंकताना नाका तोंडावर रुमाल ठेवावा, असे आवाहन त्‍यांनी केले. खोकला किंवा तत्सम आजार झाल्यास तात्काळ वैद्यकीय तपासणी करून उपचार करून घ्यावे. 

भव‍िष्‍यात राज्‍यात किंवा पुणे ज‍िल्‍ह्यात  'कोरोना'चा उद्रेक झाला तरी  जिल्ह्यातील सर्व यंत्रणा 'कोरोना' उपचारासाठी दक्ष असून नागरिकांनी भीती बाळगू नये, असे जिल्हाधिकारी श्री नवल किशोर राम यांनी आवाहन केले आहे

टॅग्स :corona virusकोरोनाPuneपुणेHealthआरोग्य