शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात ‘आप’ला उमेदवार नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 19:54 IST

आम आदमी पक्षाचा पुण्यामधील लोकसभेचा उमेदवार जाहिर करण्यात येणार असल्याचे शहर पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.

ठळक मुद्देसध्या राज्य आणि पुण्यामध्येही आम आदमी पक्षा पक्षाची स्थिती फारशी नाही चांगली

पुणे : राजकीय संस्कृतीच्या परिवर्तनासाठी हातामध्ये झाडू घेऊन महाराष्ट्रामध्ये उतरलेल्या आम आदमी पक्षाने राज्यात यंदाची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यातही ‘आप’ला उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा सत्तापक्षाला होऊ नये असे कारण दिले जात असले तरी कमकुवत पक्ष संघटना, पक्ष बांधणीकडे झालेले दुर्लक्ष आणि निधीची कमतरता अशी अनेक कारणे निवडणूक न लढण्यामागे आहेत. आम आदमी पक्षाचा पुण्यामधील लोकसभेचा उमेदवार जाहिर करण्यात येणार असल्याचे शहर पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. पुण्यामधून उमेदवारीसाठी पाच नावे केंद्रिय समितीकडे पाठविण्यात आली होती.  अ‍ॅड. असिम सरोदे, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार, कर्नल सुरेश पाटील, श्रीकांत आचार्य आणि शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. मात्र, पक्षाच्या दिल्लीतील  ‘पॉलिटीकल अफेअर्स कमिटी’ने महाराष्ट्रामधील पक्षाची सद्यस्थिती पाहता लोकसभा निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आम आमदी पक्षाने पुण्यातील लोकसभा निवडणूक लढवावी अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांची अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी काही नावे शोधली होती. परंतू, केंद्रिय समितीच्या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. सध्या राज्यामध्ये आणि पुण्यामध्येही पक्षाची स्थिती फारशी चांगली नाही. वास्तविक आप राज्यामध्ये दाखल झाल्यापासूनच अपेक्षेप्रमाण पक्ष वाढू शकला नाही. निवडणूक न लढण्यामागे निधीचा अभाव, आर्थिक बाजू कमकूवत असणे, सक्षम उमेदवारांची वानवा अशी अनेक कारणे आहेत. कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यात स्थानिक पदाधिकारी कमी पडले ही वस्तुस्थिती आहे. तुर्तास पुण्यात आणि राज्यातही आप निवडणुका लढणार नाही. 

टॅग्स :PuneपुणेAAPआपPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक