शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

पुणे जिल्ह्यात अद्याप 'बर्ड फ्लू' लागण नाही; कोणत्याही अफवांना बळी पडू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 11:25 AM

चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन

पुणे:  अंडी, चिकन शिजवून खाल्ल्यास कोणताही अपाय होत नाही, असे सांगून नागरिकांनी 'बर्ड फ्लू' संदर्भात चुकीच्या माहितीवर आधारित कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करुन पुणे जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झालेले अद्याप आढळून आलेले नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाच्या वतीने ‘बर्ड फ्लू’ समन्वय सभा आज  जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त शितलकुमार मुकणे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बर्ड फ्लू च्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दृष्टीने जिल्हा प्रशासनाबरोबरच पशुसंवर्धन विभाग व आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे सांगून महापालिकेने मदत कक्षामधून नागरिकांना  योग्य ती माहिती द्यावी.  जिल्ह्यात पक्षी स्थलांतरासाठी असणाऱ्या पाणथळाच्या जागांवर विशेष लक्ष द्यावे. एखादा पक्षी  मयत झालेला आढळल्यास त्याद्वारे संसर्ग पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त डॉ. शितलकुमार मुकणे यांनी बर्ड फ्लू च्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.

टॅग्स :PuneपुणेBird Fluबर्ड फ्लूcollectorजिल्हाधिकारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड