मोशी डेपोमध्ये पडतेय कचऱ्याची भर

By Admin | Updated: December 18, 2014 04:38 IST2014-12-18T04:38:07+5:302014-12-18T04:38:07+5:30

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्पाची (बायोमेडिकल वेस्ट) इन्सिनरेटर यंत्र

There is a lot of garbage in the Moshi Depot | मोशी डेपोमध्ये पडतेय कचऱ्याची भर

मोशी डेपोमध्ये पडतेय कचऱ्याची भर

पिंपरी: महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्पाची (बायोमेडिकल वेस्ट) इन्सिनरेटर यंत्रणा मोशीतील कचरा डेपोमध्ये हलविण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता हॉटेल वेस्टच्या विल्हेवाटीची स्वतंत्र यंत्रणा मोशीतील कचरा डेपोत कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आतापर्यंत मोशीतील कचरा डेपो अन्यत्र स्थलांतरित होईल, अशी आशा बाळगलेले रहिवासी आणखी कचऱ्याच्या विळख्यात अडकणार आहेत.
शहरात हॉटेल वेस्टचा सुमारे ५० टन कचरा रोज जमा होतो. घरगुती वापरातून बाहेर पडणारा कचरा ठिकठिकाणच्या कुंड्यांमध्ये जमा केला जातो. हॉटेल वेस्टसह रोज मोशीतील कचरा डेपोत एकाच वेळी सुमारे ६०० टन कचरा जमा होतो. त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण होते. ते टाळण्यासाठी हॉटेल वेस्टची विल्हेवाट स्वतंत्ररीत्या लावण्यासाठी प्रकल्प उभारणीचा महापालिका अधिकाऱ्यांचा मनोदय आहे. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित कराह्ण (बीओटी) तत्त्वावर बायोगॅस प्रकल्प सुरू केला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक दिवशी ६०० टन ओला व सुका कचरा मोशी कचरा डेपोमध्ये टाकला जातो. या कचऱ्यापैकी सुमारे ५० टन कचरा हा हॉटेल वेस्ट आहे. हॉटेलमधून येणारा सगळा कचरा ओलाच असतो. मात्र, हा ५० टन कचरा मोशीतील कचरा डेपोमध्ये जातो. तेथे इतर कचऱ्यांमध्ये तो मिसळला जातो. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावताना अडचणी येतात.
हॉटेल वेस्टची स्वतंत्ररीत्या विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणे आवश्यक वाटल्याने पर्यावरण विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. हॉटेल वेस्टची स्वतंत्र विल्हेवाट लावण्यासाठीचा प्रस्ताव पर्यावरण विभागाकडून तयार करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेला दोन ते तीन एकर जागा उपलब्ध करून द्यायची आहे. महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर बायोगॅस प्रकल्प चालविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून मोशी कचरा डेपोजवळ जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर अत्यंत घातक मानला जाणारा रुग्णालयीन कचरा (जैववैद्यकीय कचरा) नष्ट करणारी यंत्रणासुद्धा मोशीतील कचरा डेपोतच कार्यान्वित करण्यात येणार आहे.
शस्त्रक्रियेवेळी रुग्णांच्या शरीराचे, अवयवाचे कापलेले भाग, तसेच वापरात आलेल्या इंजेक्शन सुया, सिरिंज, टाकाऊ वस्तू अन्य कचऱ्याप्रमाणे नष्ट करता येत नाहीत. विशिष्ट प्रक्रिया करून अशा जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागते. (प्रतिनिधी)

Web Title: There is a lot of garbage in the Moshi Depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.