शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील तब्बल ६० पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिटच नाही; अवघ्या ३८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:45 IST

-  ११ पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरू; २३ पुलांचे करणार तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट

पुणे : शहरातील तब्बल ६० पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिटच करण्यात आलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरात एकूण ८६ मोठे पूल, तर १७० लहान पूल असून, त्यापैकी अवघ्या ३८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले आहे. त्यापैकी ११ पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरू असून २३ पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. दरम्यान, मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळी रविवारी इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल अचानक कोसळल्याने अनेक पर्यटक नदीत पडले आणि वाहून गेले. चार जणांचे मृतदेह सापडले असून, ३२ जण यामध्ये जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शहरातून ४४ किलोमीटर लांब मुळा-मुठा नदी वाहते. या दोन्ही नद्यांमध्ये ब्रिटिशकालीन पूल आहेत. त्यात गेल्या काही वर्षांत नवीन पुलांची भर पडली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी, शहराचे दोन्ही भाग जोडण्यासाठी विकास आराखड्यातही अनेक पूल सुचविलेले आहेत. शहराचा विस्तार आणि वाहतुकीची समस्या गंभीर होत असताना पुलांची संख्या वाढवून पर्यायी मार्ग तयार केले जात आहेत. यासोबतच नवीन व जुन्या पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषतः पावसाळ्यात नदी, नाल्यांना पूर आल्याने पूल वाहून गेल्यामुळे अपघात घडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. पुणे महापालिकेने २०१३-१४ मध्ये १८ नद्यांवरील पुलांचे, तर २०१८-१९ मध्ये १२ पूल आणि उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. त्यानंतर पुणे शहरातील २० वर्षांपेक्षा जुन्या झालेल्या ३८ पुलांचे पुणे महापालिकेने वर्ष २०२१ मध्ये स्ट्रक्चरल ऑडिट केले. नदीवरील ३२ पूल, २० उड्डाणपूल, ९ रेल्वे उड्डाणपूल या प्रमुख पुलांची संख्या ६१ आहे. त्यापैकी ३८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. उर्वरित २३ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले नाही. या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने केले जाणार आहे.

शहरातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केेले जाणार आहे. या पुलांचे दरवर्षी स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे. - नवल किशाेर राम, आयुक्त, पुणे महापालिका

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र