शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या अर्थसंकल्पात तीर्थक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी तरतूद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 10:48 IST

आळंदीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करणे आवश्यक

आळंदी : शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर गुरुवारी (दि.८) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात प्रमुख मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. विशेषतः तुकाराम बीजेचा मुहूर्त असल्याने अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास प्रारंभ केला. मात्र राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदी व तीर्थक्षेत्र देहूच्या विकासासाठी अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद केली नाही हे विशेष.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत विकासाची अनेक कामे प्रलंबित आहेत. पवित्र इंद्रायणी प्रदूषण मुक्त करणे,  इंद्रायणीचा घाट सुसज्ज करणे, भाविकांसाठी सुसज्ज दर्शनबारी उभारणे, मंदिर व शहर परिसराचा विकास करणे आदी कामे प्रामुख्याने करणे आवश्यक आहे. मात्र सादर केलेल्या अर्थसंकल्पात आळंदीसाठी निधीची तरतूद नसल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.           सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, आळंदीत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनने सुमारे साडेचारशे एकर क्षेत्रात ज्ञानभूमी साकारणार आहे. यामध्ये वारकऱ्यांसाठी सुसज्ज निवास व्यवस्था, हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, वारकरी शिक्षण संस्था उभारण्यात येणार आहे. वारकरी शिक्षण संस्थेत नव्याने कीर्तनकार प्रवचनकार घडतील. प्रामुख्याने वारी म्हणजे काय? याची प्रतिकृती अर्थातच 'ज्ञानवारी' साकारणार आहे. ज्याचा लाखों भाविक व वारकऱ्यांना फायदा होणार आहे. वारकऱ्यांसाठी आरोग्य विमा तरतूद असणे गरजेचे आहे. विशेषतः सरकारने वारकऱ्यांसाठीही 'एक खिडकी' योजना राबविणे आवश्यक आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करणे आवश्यक होते.

आळंदीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करणे आवश्यक 

 शिंदे - फडणवीस सरकारने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र या अर्थसंकल्पात भाजप तसेच शिंदे गटाच्या आमदारांना झुकते माप देत त्यांच्या मागणीनुसार निधीची तरतूद केली आहे. तीर्थक्षेत्र आळंदीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करणे आवश्यक होते. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. - दिलीप मोहिते पाटील, आमदार खेड तालुका.

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2023Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस