शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते- सुप्रिया सुळे

By राजू हिंगे | Updated: August 24, 2023 14:50 IST

देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने केला अन्याय...

पुणे : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असे सांगतानाच राज्यात एक उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत. दुसरे कुठले आहेत? कुठल्या पक्षाचे आहेत? मला माहिती नाही, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले. पुणे महापालिकेत मतदारसंघातील प्रश्नासंदभाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विशाल तांबे आदी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमचा पक्ष अजून एकच आहे. पक्ष फुटलेला नाही. एक गट सतेत्त आहे तर एक गट विरोधी पक्षात आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यात भेट झाली. उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरात ही बैठक झाली. ही गुप्त भेट असल्याचं बोललं गेलं. त्यावर आम्ही गुप्त बैठक करत नाही. चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक का होईल?, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

भाजपने अनेकवेळा राष्ट्रवादीला फोडण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना त्यामध्ये अपयश आलं. यावेळी मात्र भाजपला ते शक्य झालं. त्यांना काहीही करुन सत्तेत यायचं आहे. साम दाम दंड भेद असं स्वत: देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद  पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झालेले नाहीत. ते दिल्लीच्या राजकारणात आहेत.  

देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने केला अन्याय-उपमुख्यमंत्री , भाजपचे देवेद्र फडणवीस यांनी  १०५ आमदार निवडून आणले आहेत. पण ते मुख्यमंत्री झालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर भाजपने अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मी काही बोलणार नाही असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस