शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोरमध्ये 'हगणदारीमुक्ती'चा फज्जा; सार्वजनिक स्वच्छतागृह 'असून अडचण नसून खोळंबा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:55 IST

- अस्वच्छ व अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे लोणी काळभोर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात : तातडीने सोय करण्याची नागरिकांची मागणी

लोणी काळभोर : सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत, यासाठी एकीकडे ‘राइट टू पी’ ही जनचळवळ उभी राहिली आहे. मात्र, दुसरीकडे अस्वच्छ व अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे लोणी काळभोर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.ग्रामपंचायत लोणी काळभोर हद्दीतील सार्वजनिक शौचालये जीर्ण अवस्थेत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहेत. नागरिकांना प्रचंड दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. यामुळे ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ असे म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे. लोणी काळभोर गावातील सार्वजनिक शौचालये सध्या जनावरे बांधण्याचा गोठा झाला असून शौचालयाची दरवाजे सडून तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामध्ये पाण्याची व्यवस्था नसून शौचालयाची भांडी मोडलेली आहेत.रहिवाशी प्रात:विधीसाठी अनेकदा मोकळ्या मैदानावर जात होते. सर्वत्र दुर्गंधी पसरण्यासह आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या यासाठीच सुलभ शौचालय उभी केली होती. परंतु, शौचालयाच्या अवस्था दयनीय झाल्याने नागरिक पुन्हा मोकळ्या जागेवर प्रात:विधीसाठी जाऊ लागल्याने सार्वजनिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होऊ लागले आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टीच्या मराठा सेलचे हवेली तालुकाध्यक्ष गोरख मोरे यांनी केली आहे. ग्रामस्वछता अभियान फक्त नावापुरतेच  शौचालयांची दुरवस्था असल्याने अनेक भागातील रहिवासी इच्छा नसताना रात्रीच्या अंधारात उघड्या मैदानात शौचालयास जातात. काही जण शौचालयांबाहेरच लघु शंका करतात. तर आठवडे बाजारात शौचालयांची व्यवस्था नसल्याने खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडूनही मोकळ्या जागांचा वापर होतो. यामुळे सरकारच्या हागणदारीमुक्त उपक्रमाचे तीन तेरा वाजत आहेत. ग्रामसेवक व ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्या होत आहे, असा नागरिक आरोप करीत आहेत.

दैनंदिन वापरात असलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे ग्रामपंचायत कामगारांकडून स्वच्छ ठेवली जातात. तसेच वापरत नसलेल्या स्वच्छतागृहांची परिस्थिती पडताळून त्यासाठी पुढील उपाययोजना केल्या जातील. स्वच्छतागृहांच्या अडचणीसाठी ग्रामपंचायतीला कुठल्या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. - भरत काळभोर, सरपंच, लोणी काळभोर 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcivic issueनागरी समस्या