शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"प्रशांत किशोर यांच्याशिवायही काँग्रेसमध्ये बरेच काही घडतेय; पराभवानंतरही आम्ही हरलेलो नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 12:58 IST

अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले, केंब्रिजमधून डॉक्टरेट केलेले अविजित हे लोकसभेच्या माजी सभापती मीराकुमार यांचे पुत्र. खासगी कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते

राजू इनामदारपुणे : देशाला जगाबरोबर ठेवण्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच धार्मिक, जातीय विद्वेषाने सध्याच्या काळात देश पोखरला जात असताना काँग्रेस स्वस्थ बसूच शकत नाही. प्रशांत किशोर चर्चेत आहेतच, पण त्याशिवायही काँग्रेसमध्ये बरेच काही घडत आहे, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अंशुल अविजित ‘लोकमत’शी बोलताना आपली भूमिका मांडत होते. धार्मिक विद्वेषाचा आम्ही एकमताने सामना करणारच. अखेर विजय आमचाच होईल, असा विश्वास अविजित यांनी व्यक्त केला.

अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले, केंब्रिजमधून डॉक्टरेट केलेले अविजित हे लोकसभेच्या माजी सभापती मीराकुमार यांचे पुत्र. खासगी कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. शनिवारी  दुपारी त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. 

प्रश्न : काँग्रेसची राजकीय पीछेहाट का झाली?अविजित :  काँग्रेसचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचत नाही, असे आमच्या लक्षात आले आहे, त्याची कारणेही समजली आहेत, तसेच काँग्रेसनेच या काळात पुढाकार घेऊन देशाला भविष्यात हानी पोहोचविणाऱ्या शक्तीपासून वाचवायला हवे, हेही आता सर्वांना पटले आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस समर्थपणे देशात उभी राहिलेली दिसेल. आम्ही काम सुरू केले आहे. वाढते धार्मिक ध्रुवीकरण मात्र चिंताजनक आहे व त्याचा समर्थपणे सामना करण्याची जबाबदारी काँग्रेसचीच आहे.निष्ठावान नेत्यांना बाजूला ठेवून व्यावसायिक रणनीतीकार आणल्याने सुधारणा होईल? तेवढेच सुरू आहे असे नाही. ज्येष्ठांना बाजूला वगैरे ठेवलेले नाही, नवी पिढी कोणत्याही पक्षात येतच असते. तशी ती काँग्रेसमध्येही आली, एवढाच  अर्थ आहे.

काय करणार आहे काँग्रेस?सामान्य माणसांचे हित, जातीपातींना वाव नाही, धर्माच्या आधारावर नाही, माणूस म्हणून विचार करून धोरण आखणी हा काँग्रेसचा मूलभूत विचारच आम्ही विसरलो होतो. आता थेट नागरिकांमध्ये जाऊन या सर्व गोष्टी समजावून सांगणार आहोत.

या देशाचे अर्थकारण हाच सध्या चिंता करण्यासारखा विषय आहे. आर्थिक विषयावर झालेल्या संपूर्ण पराभवामुळेच भाजपा सरकार कधी हिजाब, कधी मांसाहार असे मुद्दे उपस्थित करीत आहेत. महाराष्ट्रातून आता त्याला भोंग्यांची साथ मिळत आहे. - अंशुल अविजित

टॅग्स :congressकाँग्रेस