शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गेल्या ९ वर्षांपासून मिळकत करात वाढ नाही; पुणे महापालिका इतर उत्पन्न वाढीवर भर देणार

By राजू हिंगे | Updated: January 29, 2025 18:58 IST

मिळकतकराच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होणार असला, तरी प्रशासनाकडून नवीन मिळकतींची कर आकारणी, थकबाकी वसुली, मिळकतींचा लिलाव या माध्यमातून उत्पन्नवाढीवर भर दिला जाणार

पुणे : पुणे महापालिका २०२५-२६ या आर्थिक वर्षात मिळकतकरात कोणतीही वाढ करणार नसल्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. त्यामुळे महागाईने कंबरडे मोडलेल्या पुणेकरांना मिळकत करात वाढ नसल्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या नऊ वर्षापासून पुणेकरांच्या मिळकत करात वाढ झालेली नाही.

पुणे महापालिकेचे २०२५-२६ या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने २० फेब्रुवारीपूर्वी करवाढीबाबतचा निर्णय घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे पालिकेच्या मिळकत कर संकलन विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला. पुणे महापालिकेवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकराज आहे. पालिकेची सर्वसाधारण सभा अस्तित्वात नाही. त्यामुळे करवाढ हा धोरणात्मक निर्णय असल्याने प्रशासकांकडून मिळकतकर ‘जैसे थे’ ठेवण्यात आला आहे. मिळकतकराच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होणार असला, तरी प्रशासनाकडून नवीन मिळकतींची कर आकारणी, थकबाकी वसुली, मिळकतींचा लिलाव या माध्यमातून उत्पन्नवाढीवर भर दिला जाणार आहे.

पुणे महापालिकेने यापूर्वी २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात अनुक्रमे १६ टक्के करवाढ केली होती. त्यानंतर गेल्या आठ वर्षांत शहरात कोणतीही करवाढ झालेली नाही २०१७ मध्ये पालिकेत ११ गावांचा समावेश केल्याने, तसेच २०२१ मध्ये आणखी २३ गावांचा समावेश केल्याने महापालिकेच्या मिळकतकराच्या उत्पन्नात वाढ होत गेली आहे. मिळकतकर आकारणीत दिल्या जाणाऱ्या सवलतीही कायम असणार आहेत. त्यात प्रामुख्याने नागरिक स्वत: राहत असल्यास निवासी मिळकतीस ४० टक्के सवलत, वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या पत्नी अथवा आईच्या स्वत: राहत असलेल्या मिळकतीस दिल्या जाणाऱ्या सवलती, शहरातील राष्ट्रपती पदक देण्यात आलेल्या व्यक्तींच्या मिळकतींच्या सवलती कायम असणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTaxकरMONEYपैसाSocialसामाजिकIncome Taxइन्कम टॅक्स