दहा तासांत तब्बल २६,६५५ फोटो
By Admin | Updated: January 20, 2016 00:54 IST2016-01-20T00:54:51+5:302016-01-20T00:54:51+5:30
दहा तासात तब्बल २६ हजार ६५५ फोटो तेही १५२ मॉडेलस्च्या सहाय्याने! हा जागतिक विक्रम केला आहे उमेश पद्माकर चावक यांनी.

दहा तासांत तब्बल २६,६५५ फोटो
पुणे : दहा तासात तब्बल २६ हजार ६५५ फोटो तेही १५२ मॉडेलस्च्या सहाय्याने! हा जागतिक विक्रम केला आहे उमेश पद्माकर चावक यांनी. एका दिवसात इतके फोटो काढण्याता असा विक्रम राज्यात प्रथमच घडला आहे.
स्थळ येरवडा येथील आतूर भवन, राम सहकारी सोसायटी. सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी उमेश चावक यांनी फोटो काढण्यास सुरुवात झाली. आणि फोटो काढून थांबले ते सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी. म्हणजे सलग १० तास त्यांनी फोटोग्राफी केली. योगासनाच्या वेगवेगळ्या मुद्रांनी ह्या रेकॉर्डची त्यांनी सांगता केली. हे वर्ल्ड रेकॉर्ड साध्य करता यावे यासाठी उमेश चावक यांनी तब्बल तीन महिने प्रशिक्षण व परिश्रम घेतले.
वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड इंडियाचे दिनेश पैठणकर या प्रसंगी निरिक्षक म्हणून उपस्थित होते. चावक यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केल्याची त्यांनी घोषणा केली. (प्रतिनिधी)