थेरगावात पोलिसांना टोळक्याची मारहाण
By Admin | Updated: March 24, 2017 04:11 IST2017-03-24T04:11:30+5:302017-03-24T04:11:30+5:30
प्रतिबंधात्मक कारवाईसंबंधीची नोटीस बजावण्यास गेलेल्या पोलिसांना थेरगाव, पडवळ नगर येथे तेथील टोळक्याने दांडक्याने मारहाण केली.

थेरगावात पोलिसांना टोळक्याची मारहाण
पिंपरी : प्रतिबंधात्मक कारवाईसंबंधीची नोटीस बजावण्यास गेलेल्या पोलिसांना थेरगाव, पडवळ नगर येथे तेथील टोळक्याने दांडक्याने मारहाण केली. त्यात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. बेकायदेशीर जमाव जमवून कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणला अशा स्वरूपाचा गुन्हा दहा जणांवर दाखल करण्यात आला आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश कैलास कांबळे याला प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देण्यासाठी जात असताना, संतोष अशोक सुर्यवंशी (रा. थेरगाव) यांना टोळक्याकडून मारहाण केली जात असल्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. हटकण्याचा प्रयत्न केल्यानंतर टोळक्याने हॉकी स्टिक, दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी त्यांनी जगदाळे व झेंडे या दोन पोलिसांना जबर मारहाण केली. लखन उर्फ प्रविण बारणे, रूपेश शामदास वाघेरे, साधुराम वाघेरे, स्वप्निल साधुराम वाघमारे,सत्यविजय साधुराम वाघमारे, मिना वाघमारे या आरोपींसह अन्य आठ ते दहा साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)