...तर राजकारणातून संन्यास - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 03:04 IST2017-08-12T03:04:05+5:302017-08-12T03:04:08+5:30

शेतकऱ्यांना कर्ज माफीसाठीचा आॅनलाईन अर्ज अत्यंत किचकट असून, तो भरणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना अशक्यच आहे. भाजपाच्या एखाद्या मंत्र्याने हा अर्ज स्वत: भरून दाखवला तर मी राजकारणातून संन्यास घेईल, असे आव्हान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

 ... then retire from politics - Ajit Pawar | ...तर राजकारणातून संन्यास - अजित पवार

...तर राजकारणातून संन्यास - अजित पवार

 पुणे : शेतकऱ्यांना कर्ज माफीसाठीचा आॅनलाईन अर्ज अत्यंत किचकट असून, तो भरणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना अशक्यच आहे. भाजपाच्या एखाद्या मंत्र्याने हा अर्ज स्वत: भरून दाखवला तर मी राजकारणातून संन्यास घेईल, असे आव्हान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १००वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी अल्पबचत भवनमध्ये झाली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात, उपाध्यक्षा अर्चना घारे, आमदार दत्तात्रय भरणे, बँकेचे मुख्यअधिकारी संजय भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, अशोक पवार, पोपटराव गावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, सुरेश घुले, निवृत्ती गवारे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य सरकार शेतकºयांविषयी असंवेदनशील आहे सांगत पवार म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारचा हा निर्णय जिल्ह्यातीलच नव्हे तर देशातील शेतकºयांवर आघात करणारा होता. या निर्णयामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ५७४ कोटी रुपये पाच ते सहा महिने पडून होते. हे पैसे शेतकºयांचे होते. शेतकºयांना त्या पैशाचे व्याज देणे भागच पडते. त्यामुळे बँकेला २० कोटी रुपयांचा तोटा झाला. देशातील सहकारी संस्थांचे तब्बल ४४ हजार कोटी रुपयांचे चलन पडून होते. या पुणे जिल्हा मध्यवर्तीत सहकारी बँकेचे ५७४ कोटी रुपये होते.’’

Web Title:  ... then retire from politics - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.