.. तर पुणो बनेल आयआयएमपी!

By Admin | Updated: July 11, 2014 23:35 IST2014-07-11T23:35:27+5:302014-07-11T23:35:27+5:30

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये देशभरात नवीन पाच भारतीय व्यवस्थापन संस्था सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे.

.. then Puno Banel IIMP! | .. तर पुणो बनेल आयआयएमपी!

.. तर पुणो बनेल आयआयएमपी!

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये देशभरात नवीन पाच भारतीय व्यवस्थापन संस्था सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यातील एक संस्था महाराष्ट्रात सुरू होणार असून, ती पुण्यातच साकारेल, असा विश्वास उद्योजकांकडून वर्तवला जात आहे. पुण्यात आयआयएम साकारल्यास व्यवस्थापनक्षेत्रसाठी हे ब्रँड शहर बनून आयआयएमपी ही पुण्याची नवी ओळख निर्माण होईल. 
सद्य:स्थितीमध्ये महाराष्ट्रात ही संस्था सुरू करण्यासाठी पुणो हेच सर्वात अनुकूल असे शहर आहे. त्याला कारण आहे, पुण्याकडे उपलब्ध असणारी जागा. मुंबई हे शहर औद्योगिकदृष्टय़ा प्रगत व आर्थिक राजधानी असले, तरीही आयआयएम ही राष्ट्रीय स्तरावरील संस्था उभारण्यासाठी लागणारी मोठी जमीन उपलब्ध करून देण्यात त्यांना अडचणी येऊ शकतात. पुण्याला मात्र तशी अडचण नाही. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय विमानतळ, नव्या मेट्रोचा प्रस्ताव आदी बाबींमुळे पुणो शहर हे आयआयएम उभारण्यासाठी आदर्श आहे, असे मत मिटसॉमचे प्राचार्य डॉ. रवी चिटणीस यांनी व्यक्त केले. 
 
विद्याथ्र्याचे व्यवस्थापन 
पुण्यामध्ये आयआयएमच्या माध्यमातून विद्याथ्र्याना व्यवस्थापनाचे एक उच्चतम, दज्रेदार असे शिक्षण प्राप्त होऊ शकेल. विद्यानगरीच्या शिरपेचात अशी संस्था म्हणजे आणखी एक मानाचा तुरा ठरेल. त्यातून कुशल व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी दर वर्षी बाहेर पडतील. 
एक्ङिाक्युटिव्हना प्रशिक्षण
पुण्यामध्ये सद्य:स्थितीत हिंजवडी, खराडी, कल्याणीनगर, मगरपट्टा या भागांमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या अनेक कंपन्या एकवटल्या आहेत. तसेच, चाकण एमआयडीसी, पिंपरी चिंचवड येथे उद्यमनगरी आहे. येथे कार्यरत असणा:या एक्ङिाक्युटिव्हना व्यवस्थापनाचे अद्ययावत प्रशिक्षण पुण्यातच उपलब्ध होऊ शकेल. 
राज्य-देशातून ओघ पुण्याकडे
केवळ पुण्यातीलच नाही, तर राज्यभरातील उद्यमजगत व देशातील नावाजलेले उद्योजक प्रशिक्षणासाठी त्यांच्या लोकांना पुण्यातील आयआयएमकडे पाठवतील. 
अध्यापकांना नवी संधी 
एखादी राष्ट्रीय स्तरावरची संस्था जेव्हा उभी राहते तेव्हा त्यांना त्यादृष्टीने अध्यापकांची फळी तयार करावी लागते. पुण्यातील व्यवस्थापनाचे अध्यापन करणा:या अनेकांना त्यातून नवी संधी प्राप्त होणार आहे. 
संशोधनवृत्तीचा विकास
आयआयएमसारखी एक नावाजलेली संस्था पुण्यात सुरू झाल्यास व्यवस्थापनाच्या क्षेत्रत संशोधनवृत्तीचा विकास होऊन त्याला गती येईल. मोठय़ा प्रमाणावर संशोधनाला चालना मिळेल. 
केसस्टडी वाढणार
केवळ थिअरॉटीकल अभ्यास करण्यापेक्षा हॉर्वड बिझनेस स्कूलच्या धर्तीवर उद्यमजगतातीलच केस स्टडी घेऊन त्यावर अभ्यास करण्यावर आयआयएमचा भर असतो त्यामुळे त्यातून विविध संस्था व उद्योगांतील लोक आयआयएमकडे केसस्टडीसाठी आवजरून वळतील. 
पुण्याचा मानदंड
पुण्याच्या सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात आयआयएमसारखी एक संस्था येण्याने एक नवा मानदंड प्रस्थापित होईल. ही सर्वात मोठी संस्था ठरेल. आयआयएम स्थापन झाल्यानंतर पुण्याच्या कक्षा स्थानिक न राहता त्या आपोआपच राष्ट्रीय होतील. पुणो नॅशनल रडारवर येईल. 
औद्योगिक गुंतवणूक वाढेल
आयआयएमसारख्या संस्थांकडे औद्योगिक कंपन्या त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी धाव घेतील. त्यांच्या विविध समस्यांतून मार्ग काढण्यासाठी व्यवस्थापन कौशल्याची गरज लागते त्यासाठी अशा प्रकल्पांवरही 
आयआयएम संस्था काम करू शकते, असे डॉ. चिटणीस यांनी सांगितले. त्यामुळे पुण्यामध्ये आयआयएमसारखी नावाजलेली व्यवस्थापन संस्था आल्यास पुण्याचा एक वेगळा मानदंड प्रस्थापित होईल, हे निश्चित.
 
कृषी संशोधनातही पुणो घेणार आघाडी
पुणो : केंद्रीय अर्थसंकल्पात पुण्यामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान संकुल (अॅग्रो बायोटेक क्लस्टर) उभारण्याच्या घोषणोमुळे पुणो आता कृषी संशोधन क्षेत्रतही आघाडी घेणार आहे. 
पुण्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील कांदा आणि लसूण संशोधन केंद्र, द्राक्षे संशोधन केंद्र आहे. तसेच, वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटसारखी राज्य पातळीवरील उसाचे संशोधन करणारी संस्था आहे. बायोटेक क्लस्टरमुळे कृषी संशोधनाला आणखी वाव मिळणार आहे. 
पुण्यामध्ये आयटी, ऑटोमोबाईल यांसारख्या कंपन्यांमुळे महाविद्यालयीन पातळीवरही यासाठी आवश्यक अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. मात्र, कृषी क्षेत्रशी संबंधित अभ्यासक्रमांचे प्रमाण कमी आहे. काही मोजक्या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजीचे अभ्यासक्रम आहेत.
जवळपास सर्व प्रकारचे वातावरण पुणो जिल्ह्यात पाहावयास मिळते. त्यामुळे पिकांमध्येही वैविध्य आहे. बायोटेक क्लस्टरसाठी हे महत्त्वाचे ठरणार आहे. 
 
कृषी आयुक्तालयाबरोबरच विविध संस्था, विद्यापीठ पातळीवरील संशोधनाची सुविधा यांमुळे जैवतंत्रज्ञानाचे संशोधन करण्यासाठी पोषक वातावरण आहे. नवीन जाती विकसित करण्यासाठी, तसेच त्यावरील संशोधन, हवामानात होणा:या बदलांचा अभ्यास करून त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी या संकुलाचा उपयोग होईल.
- उमाकांत दांगट, कृषी आयुक्त 
 

 

Web Title: .. then Puno Banel IIMP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.